शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

नंदुरबार तालुक्यात 65 जागांसाठी 144 उमेदवारांमध्ये रंगताहेत लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 1:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात १५ ग्रामपंचायती माघारीअंति बिनविरोध झाल्या होत्या. यातून तालुक्यात केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात १५ ग्रामपंचायती माघारीअंति बिनविरोध झाल्या होत्या. यातून तालुक्यात केवळ सात ग्रामपंचायतींमध्ये येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, गावोगावी मतदानाचा उत्साह कायम आहे. या गावांमध्ये सध्या जोरदार प्रचार रंगत आहेत. तालुक्यातील खुर्दे खुर्द, बलदाणे, खोक्राळे, निंभेल, न्याहली, शनिमांडळ, तलवाडे खुर्द, तिलाली, आराळे, खोंडामळी, मांजरे, शिंदगव्हाण, विखरण, नगाव आणि काकर्दे या १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. सात ग्रामपंचायती या अर्ज छाननीच्या दिवसापासून बिनविरोध झाल्याचे चित्र होते, तर आठ ग्रामपंचायतींसाठी दाखल अर्ज माघारी गेल्यानंतर त्या बिनविरोध झाल्या होत्या. ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या घटून प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान कोपर्ली, भालेर, हाटमोहिदे, भादवड, कार्ली, कंंढ्रे, वैंदाणे या सात ग्रामपंचायतींच्या ६५ सदस्य पदाच्या जागांसाठी एकूण १४४ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांकडून प्रचारालाही सुरुवात झाली असून, गावोगावी पॅनलच्या माध्यमातून निवडणूका लढवल्या जात आहेत. यात प्रामुख्याने भालेर येथे ११ सदस्य पदाच्या जागांसाठी ३०, तर कोपर्ली येथील ११ सदस्यपदांच्या जागांसाठी २५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रचाराची पद्धत उमेदवारांनी बदलल्याचे दिसून येत आहे. गावे खूप मोठी नसल्याने दहा दिवसांत प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणे उमेदवाराला शक्य असल्याने घरोघरी थेट भेट देत उमेदवारीची माहिती देऊन मतदान करण्यासाठी मतदारांना साकडे घालण्याचा कार्यक्रम उमेदवारांचा सुरू आहे. यातून गावोगावी मौखिक प्रचाराचे युद्धही रंगत आहे. या निवडणुकीसाठी २५ ते ३५ हजार रुपयांचा खर्च सदस्यपदाच्या जागांसाठी करावा लागणार आहे. परंतू निवडणुकीची रंगत पाहता यापेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांची धावपळ होत आहे.   १३ हजार मतदार या निवडणुकीत कोपर्ली ग्रामपंचायतीच्या ११ प्रभागांत ३ हजार १९९, कंढ्रे येथील सात प्रभागांसाठी ८०६, कार्ली येथील नऊ प्रभागांसाठी एक हजार १७२, भादवड येथील नऊ प्रभागांसाठी १ हजार ५१९, भालेर येथील ११ प्रभागांसाठी २ हजार ८५६, हाटमोहिदे येथील नऊ प्रभागांसाठी १ हजार ८५०, तर वैंदाणे येथील नऊ प्रभागांसाठी २ हजार ४८६ असे एकूण १३ हजार ८८८ मतदार मतदान करणार आहेत.

   २३ मतदान केंद्र  मतदानप्रक्रियेसाठी नंदुरबार तहसील कार्यालयाने २३ मतदान केंद्र निर्माण केले आहेत. ३० पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात पाच याप्रमाणे १५० कर्मचारी नियुक्त आहेत. या कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण पूर्ण असून, दुसरे प्रशिक्षण  १० जानेवारी रोजी आहे. प्रशिक्षणानंतर १४ जानेवारी रोजी हे मतदान अधिकारी व कर्मचारी सात ग्रामपंचायतींच्या २३ मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.