लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दरही आता स्थिरावले आह़े त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दरातही मोठी वाढ झाली होती़ मेथी, कोथंबिरचे दरही चढे होत़े परंतु दिवाळीनंतर निघालेल्या नवीन भाजीपाल्यामुळे आवक वाढली व दर हळूहळू कमी होऊ लागले आह़े त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला दर स्थिर असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आह़े जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पावसाने यंदा पाठ फिरवली होती़ त्यातच मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े ऐन दिवाळीच्या सणासुदीमध्ये भाज्यांची दरवाढ झाली होती़ शिवाय जिल्ह्यातील ब:याच शेतक:यांनी कापसाची लागवड करुन सर्व पाणी कापसालाच वापरले होत़े त्यामुळे पावसाच्या अपेक्षेवर असलेल्या भाजीपाला उत्पादकांची पाण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती़ भाजीपाल्याला पाणी मिळावे यासाठी शेतक:यांकडून विहिरींमधील उरले सुरले पाणी वापरण्यात येत होत़े त्यामुळे आवक कमी झाल्याने दिवाळीच्या काळात भाज्यांचे दरही वाढले होत़े परंतु आता त्यानंतर नवीन भाजीपाल्याची आवक वाढल्याने पुन्हा भाजीपाल्यांचे दर कमी झाले आह़े पुढील काळातही हे दर स्थिरच राहतील असे सांगण्यात येत आह़े पश्चिम भागातून मोठी आवकनंदुरबार तालुक्याच्या विचार करता पूर्व भागाच्या तुलनेत तालुक्याच्या पश्चिम भागातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असत़े त्याच प्रमाणे शहरातील माळी वाडा परिसरातूनही भाजीपाल्याची मोठी आवक होत असत़े पूर्व भागात आधीच पाण्याची टंचाई असल्याने या भागातून भाजीपाल्याची आवक होत नाही़
आवक वाढल्याने नंदुरबारातील भाजीपाला स्थिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:46 PM