लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर दीड हजार विहिरींपैकी 400 विहिरी निधीच्या प्रतिक्षेत असून उर्वरित हजार विहिरींची कामे निधी अभावी रखडली आहेत़ शासनस्तरावरून निधी प्राप्त होण्यास अडचण येत असल्याने ही समस्या निर्माण झाली आह़े शेतीविकासासह मजूरांना रोजगार मिळावा याहेतून रोहयो (महाराष्ट्र) तर्फे 2016-17 आर्थिक वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींना मंजूरी देण्यात आली आह़े ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतून दिलेल्या ठरावानुसार या याद्या तयार करण्यात आल्या होत्या़ यात अनेक ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर सिंचन विहिरीत प्रस्तावित करून निधी उचलण्याची तयारी दर्शविण्यात आली आह़े साधारण तीन लाखार्पयत मिळणारे अनुदान हे कुशल आणि अकुशल या दोन विभागात देण्यात येत़े साहित्य खरेदीसह विविध कामांना कुशल निधी तर मजूरांच्या रोजगाराला अकुशल निधी असे संबोधण्यात येत़े यानुसार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विहिरींची कामे साहित्य खरेदीसाठी निधी न मिळाल्याने रखडले आह़े यातून 400 विहिरी 70 टक्के काम आटोपूनही पूर्णत्वास आलेल्या नाहीत़ जिल्ह्यातील सर्वाधिक विहिरी ह्या अक्कलकुवा तालुक्यात मंजूर करण्यात आल्या आहेत़
नंदुरबार : 400 सिंचन विहिरींना निधीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:02 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर दीड हजार विहिरींपैकी 400 विहिरी निधीच्या प्रतिक्षेत असून उर्वरित हजार विहिरींची कामे निधी अभावी रखडली आहेत़ शासनस्तरावरून निधी प्राप्त होण्यास अडचण येत असल्याने ही समस्या निर्माण झाली आह़े शेतीविकासासह मजूरांना रोजगार मिळावा याहेतून रोहयो (महाराष्ट्र) तर्फे 2016-17 आर्थिक वर्षात जिल्ह्यात ...
ठळक मुद्देदर दिवशी साडेपाच हजार मजूर कामावर शासनाने जिल्ह्यातील 1 हजार 530 लाभार्थीची यादी मंजूर केली होती़ प्रत्येकी किमान तीन लाख रूपयांचा निधी असलेल्या विहिरींना 900 दिवसांचा आह़े यासाठी दर दिवशी जिल्ह्यात पाच हजार 500 मजूरांना रोजगार मिळणार आह़े गेल्या वर्षात