- मनोज शेलार नंदुरबार - प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिले जाणाऱ्या प्रतिजैविक औषधामध्ये (अँटिबायोटिक) चक्क अळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे.
खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविक औषधामध्ये (अँटिबायोटिक) अळी निघत असल्याची माहिती मिळताच आमदार आमश्या पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन औषधांची पाहणी केली. त्यात २१ डिसेंबर रोजी आलेल्या औषधांच्या साठ्यातील (बॅच क्र.जी.४२/५०४५) एल्फिन ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सिरपमध्ये अळी असल्याचे निदर्शनास आले. २१ डिसेंबर रोजी आलेल्या या औषधांच्या २०० बाटल्या साठ्यापैकी ४२ बाटल्या वाटप न करता विभक्त करून ठेवण्यात आल्या. नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी निलेश वसावे यांनी सांगितले.