लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्यधुंद व्यक्तीसोबत असलेला चिमुकला रडत असल्याचे पाहून संशय बळावल्याने नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिल़े चौकशीअंती मद्यपी ‘त्या’ चिमुकल्याचा पिता असल्याची माहिती मिळाल्यानंतर बालकाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आल़े साक्रीनाका परिसरात रविवारी दुपारी 1 वाजेच्या सहा वर्षीय बालक रडत असल्याचे काहींना दिसून आला़ त्याच्याजवळची व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर लोळत असल्याने काहींनी बालकाची चौकशी केली़ परंतू बालकाला उत्तर देता आले नाही़ यात संबधित हा मुले पळवणारा असल्याचा संशय घेत मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी गर्दी जमा झाली़ यातून पोलीसांना माहिती दिल्यानंतर नजीकच्या चौकीतून पोलीस कर्मचा:यांनी हजेरी लावत दोघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल़े चौकशीनंतर संबधित व्यक्ती हा मुलाचा पिता असल्याची माहिती समोर आली़ संजय भावराव मोरे रा़ साक्री असे निष्पन्न झाल्यावर मुलाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आल़े संजय मोरे यास मद्याचे व्यसन असल्याने पत्नी नवापूर येथे आई-वडीलांकडे वास्तव्यास आह़े या दाम्पत्याला सहा वर्षाचा मुलगा आह़े रविवारी संजय याने नवापूर गाठून मुलाला वह्या पुस्तके घेण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून नवापूर येथून नंदुरबारला आणले होत़े शहरात आल्यानंतर त्याने मद्य प्राशन करून मुलाला वा:यावर सोडल़े पोलीसांनी नवापूर येथे संपर्क करून मुलाच्या आईला बोलावल्यानंतर ते तात्काळ नंदुरबारला आल़े संजय मोरे यास पोलीसांनी समज देऊन साक्री येथे पाठवून दिल्याची माहिती आह़े प्रकाशा येथे अफवेमुळे जागरण प्रकाशा ता़ शहादा येथे मुले पकडणा:या टोळीतील दोन महिला फिरत असल्याची अफवा पसरल्याने त्यांचा शोध घेत पोलीस आणि नागरिक रात्रभर गावात फिरत होत़े संपूर्ण गाव पिंजून काढल्यानंतरही अज्ञात दोन महिला मात्र मिळून आल्या नाहीत़ शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास प्रकाशा गावातील तापी काठालगतच्या मच्छीबाजार, कोळीवाडा, कुंभारवाडा, नवा प्लॉट, मुंजडा हाटी या परिसरात रात्री 10़ 30 एक महिला आणि मुलीला दोन पुरूष साडी घालत असल्याचे दिसून आल़े त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली़ ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल गौतम बोराळे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना सोबत घेत परिसरात ‘त्या दोघींचा’ शोध सुरू केला़ संगमेश्वर मंदीर परिसर, कुंभारवाडा, तापी नदी काठासह संपूर्ण परिसरात शोध घेतला़ परंतू संशयित महिला आढळून आल्या नाहीत़ पहाटेर्पयत ग्रामस्थ आणि पोलीस दोघा महिलांचा शोध घेत असल्याची माहिती आह़े घटनेची प्रकाशासह शहादा तालुक्यात रविवारी सकाळपासून एकच चर्चा सुरू होती़ नागरिकांनी अफवांना बळी पडू नये- पोलीस अधिक्षक काही दिवसांपासून आपल्या जिल्ह्यात ,शेजारील जिल्ह्यात व राज्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबत समाजकंटकाकडून अफवा पसरवली जात आहे. यातून काही ठिकाणी कोणतीही शहानिशा न करता निरपराध इसमांवर हल्ले होऊन वाहनांची जाळपोळ, मारहाण करून लोकांना मारुन टाकण्यापयर्ंतच्या गंभीर घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये सदर इसम निरपराध, कामा निमित्ताने आलेले निष्पन्न होवून हल्लेखोर इसमांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. परंतू अशा प्रकारची कुठलीही टोळी कार्यरत नसून लहान मुले पळविण्याची एकही घटना जिल्ह्यात किंवा शेजारील जिल्ह्यात घडलेली नाही किंवा पोलीसात तशी नोंद नाही. अशा प्रकारच्या अफवा काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. जनतेने अफवांना बळी न पडता शंका आल्यास पोलीस स्टेशन, पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठित व सुजाण नागरिकांना सुचित करावे. अशा अफवा पसरवणे किवा फॉरवर्ड करणे हा गुन्हा असल्याचे पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी कळवले आह़े
मुलगा पळवल्याच्या संशयातून नंदुरबारात ‘पित्याला’ही बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:44 PM