ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.8 - शाळकरी 15 वर्षीय मुलाचा मृतदेह खामगाव रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
शहरातील एका शाळेत शिकणारा राज नंदकिशोर ठाकरे (15) रा.एकलव्य नगर हा मुलगा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शहर पोलिसात अपहरणाची नोंद करण्यात आली होती. शनिवारी सकाळी खामगाव रस्त्यावर या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर जखमा आढळून आल्या असून अंगात शाळेचा गणवेश आहे. घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.