नंदुरबार,दि.5 - जिल्ह्यात एकापेक्षा एक सरस नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. परंतु त्यांची माहिती पर्यटकांर्पयत पोहचत नसल्यामुळे आणि पर्यटक येत नसल्यामुळे त्यांचा विकास थांबला आहे. ही बाब लक्षात घेता पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कल्पकतेतून तयार झालेला ‘नंदनवन’ हा माहितीपट पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू पहात आहे.
सर्वाधिक रोजगार देवू शकणा:या आणि वेगाने विस्तारीत होणा:या क्षेत्रापैकी पर्यटन हा एक उद्योग आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. नंदुरबार जिल्ह्यात विस्तीर्ण अशा सातपुडय़ाच्या रांगा आहेत. या रांगांमध्ये महाबळेश्वर नंतर राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. सारंगखेडा यात्रा देशभरातील अश्वशौकिनांसाठी हेरीटेज ठरत आहे तर सातपुडय़ाच्या उंच शिखरावरील अस्तंबा यात्रा गिर्यारोहकांचा साद घालते. जिल्ह्यातून तापी व नर्मदा नदी वाहते. तापीवरील प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजमध्ये बारमाही पाणी उपलब्ध होते. तेथे स्थानिकसह थेट प्रकाशा ते सारंगखेडा दरम्यान बोटिंग सुरू करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याशिवाय सातपुडय़ाच्या पहिल्या रांगेत उनपदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. प्रकाशासारखे तीर्थक्षेत्र या जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र व तीर्थ क्षेत्राच्या विकासातून जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री रावल यांचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी दोन कोटी 66 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. सारंगखेडा यात्रेतील चेतक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यांनी सारंगखेडा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमातून ब्रँडिंग केले. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसण्याची अपेक्षा आहे.
काळमदेव, प्रकाशा, मोड-चैतन्यश्वेर, रावलापाणी, हजरत इमाम बादशाह दर्गा या पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचा होळी हा महत्त्वाचा सण. होलिकोत्सवाचेही ब्रँडींग करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांची र्सवकष माहिती असलेल्या या माहितीपटात जिल्ह्यातील सद्य:स्थितीत असलेली प्रसिद्ध पर्यटनस्थळे व पर्यटनाला चालना देणा:या पर्यटनस्थळांच्या माहितीचा समावेश आहे. गुरुवार, 4 मे रोजी रात्री 10 वाजता या माहितीपटाचे प्रेक्षपण करण्यात आले. जिल्हावासीयांसह खान्देशातील प्रेक्षकांनी आवजरून हा माहितीपट पाहिला.
असा झाला माहितीपट तयार..
पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. त्याचअंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा माहितीपट निर्माण करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले. या माहितीपटाची संकल्पना व संशोधन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचे आहे. संशोधन सहाय्य अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे तर लेखन, दिग्दर्शन व चित्रीकरण ब्रिज कम्युनिकेशनचे मिलिंद पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाला एक नवी दिशा देणारा हा माहितीपट तयार झाला आहे. त्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी मोलाचे सहकार्य केले. हा माहितीपट इतर जिल्ह्यांसाठी मॉडेल ठरणार आहे.
-रणजितसिंह राजपूत,
जिल्हा माहिती अधिकारी.