याप्रसंगी डॉ. माधव कदम यांनी आपला नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम असूनदेखील ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घ्यायचे ठरवले, तर नेटवर्कची अडचण येत असूनदेखील खूप विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. राष्ट्रीय सेवा योजनामध्ये चांगले विद्यार्थी-विद्यार्थिनी व चांगली मुलगी, चांगली सून घडविण्याचे कार्य करीत असते. राष्ट्रीय सेवा योजना हे चालता-बोलता व्यासपीठ असल्यामुळे स्वयंसेवक हे प्रेरित होत असतात.
याप्रसंगी संस्थेच्या सचिव वर्षा जाधव व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. भारत चाळसे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल एम. पाटील, तर आभार प्रा. एच. आर. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी तांत्रिक समितीचे प्रा. डॉ. साहेबराव ईशी, डॉ. प्रसन्ना डांगे, प्रा. आर. पी. पाटील, हिमांशू जाधव, राजेश राठोड, प्रा. अनिल साळुंके. प्रा. एस. यु. अहिरराव, प्रा. अशोक अहिरे यांनी परिश्रम घेतले.