लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : चांगला पाऊस पडून मुबलक प्रमाणात उत्पादन यावे, याशिवाय निसर्गापासून कुणालाही हानी न पोहोचता पाळीव जणावरेही सुखी राहावीत यासाठी सातपुड्यातील बहुसंख्य गावांमधील आदिवासी बांधवांनी नुकतेच आपापल्या गावाच्या शिवारात निसर्गाचे अनोखेपूजन करून निसर्ग दैवतेला साकडे घातले आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग पाळत संपूर्ण गाव सहभागी झाले होते.निसर्ग देवतेपासून मानवप्राणी बरोबरच पाळीव जनावरांनादेखील सुखी ठेवावे. याशिवाय शेतकऱ्यांचा हंगामदेखील यासाठी सातपुड्यातील आदिवासी गावांमधील आदिवासींमध्ये आपल्या गावाच्या सीमेवर निसर्ग देवतेचे पूजन करण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे शेतातील पेरणी उरकल्यानंतर प्रत्येक गावात समाज पंच मंडळामार्फत गावकऱ्यांची बैठक घेतली जाते. त्यापूर्वी आदल्या दिवशी कोतवालाकडून गावात दवंडी देऊन गावकºयांना बैठकीची सूचना दिली जाते. या बैठकीत निसर्ग पुजनाच्या नियोजनाचा ठराव मांडला जात असतो. सर्वशेतकºयांच्या पेरण्या आटोपल्या की नाही यावर चर्चा होऊन सर्वांच्या संमतीने तारीख निश्चित केली जात असते. त्यामुळे गावातील कुणीही व्यक्ती बाहेर गावी जात नाही.बैठकीतच आर्थिक वर्गणीचेदेखील नियोजन केले जात असते. त्याचबरोबर प्रत्येक घरातून कोतवाल पीठ व तांदूळ गोळा करीत असतो. त्याचाच भंडारा तयार केला जात असतो, असे सगळे नियोजन केल्यानंतर गावकºयांनी गावाच्या सीमेवर निसर्गाचे देऊळ बनविले आहे. तेथे पाला-पाचोळ्याचे पूजन करतात. शिवाय सर्वात जुन्या जनावरांच्या खुट्या जवळ गायीचे शेण ठेवून त्याची पूजा केली जावून मगच भंडारा गावकरी खातात. असे अनोखे निसर्ग पूजन सातपुड्यातील बहुसंख्य गावांमधील आदिवासींनी नुकतेच पार पाडले आहे. त्यांनी निसर्ग देवतेला शेतकºयांचा हंगाम चांगला जावो, पाळीव जनावरांना व मानवास कुठलीही हाणी पोहचू नये अशी प्रार्थना निसर्गदेवतेला केली आहे. गावा-गावातील सर्वच गावकरी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे गावाचे शिवार भाविकांनी फुलले होते. गावातील प्रत्येक गावकºयांनी कोरोनाचे सामाजिक अंतर ठेवन हा उत्सव साजरा केला होता.
सातपुड्यातील आदिवासी निसर्गालाही देवमानत असतात. त्यामुळेच दरवर्षी शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्णझाल्यानंतर प्रत्येक गावात निसर्ग देवतेचे पूजन करतात. त्यापूर्वी ही कुटुंबे रानातील कुठल्याही रानभाज्या खात नाही. एवढेच नव्हे साधे झाडाचे पानदेखील तोडत नसतात. याशिवाय राना-वनातील हिरवा चारा सुद्धा कापत नाही. एवढी अढळ श्रद्धा त्यांची निसर्गावर असल्याचे गावकरी सांगतात. त्याचबरोबर पावसाळा सुरू होतो तेव्हापासून घर सारणेही बंद करतात. निसर्गपूजनानंतर गायीच्या गोठ्यात जुन्या जनावरांच्या खुट्याजवळ शेण ठेवून त्याची शेंदूराने पूजा केल्यानंतर दुसºया दिवसापासून घर सारतात.