लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सोमवारी राजपूत समाजबांधवांकडून मॉ पद्मावती सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत़े या वेळी तालुका प्रशासनाला निवेदन देऊन पद्मावत चित्रपटाचा निषेध व्यक्त केलेा़शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. चित्रपटाचे निर्माता संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या विरोधात व माँ पद्मावती सन्मानात नवापूर राष्ट्रीय राणा राजपूत करनी सेनेतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला. शहरातील गणपती मंदीरापासून मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. दुपारी 12 वाजता नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संजय भन्साळी यांच्या निषेध करण्यात आला. चित्रपटावर बंदी घातलीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी हसमुख पाटील, दर्शन पाटील, धर्मेश पाटील, शरद पाटील, मयुर पाटील, नकुल पाटील, प्रवीण पाटील, विशाल पाटील, सनी पाटील, मनोज पाटील, जिग्नेश पाटील, संदीप पाटील, शंकर पाटील, रवि पाटील, संजय पाटील, गणेश पाटील, भटू पाटील, अशोक पाटील, हेमंत पाटील, हर्षल पाटील, कृष्णा पाटील, दर्पन पाटील, नाना गिरासे यांच्या सह समाजातील असंख्य युवक उपस्थित होते.
नवापूरात मॉ पद्मावती सन्मान मोर्चानिमित्त रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:44 PM