लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यात संततधार पावसाचा जोर कमी झाला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद झाल्याने राजमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी रायंगण व वजीरपाडा येथे भेटी दिल्या. रायंगण शिवारात महामार्ग क्रमांक सहावरील पुलाची ब्रिटिशकालीन फरशी तुटल्याने महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी सायंकाळी पूर्णत: बंद झाली होती तर नागङिारी जवळच्या वजीरपाडा येथील पूल वाहून गेल्याने 10 गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसाचा जोर शनिवारी ओसरला. अवजड व जास्त वाहतुकीच्या वर्दळीने नेहमी चर्चेत राहत आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार वळविण्यात आल्याने आज महामार्गावर शुकशुकाट होता. गुजरातमधून येणारी अवजड वाहने उच्छल, निझर, नंदुरबार व कुकरमुंडा, तळोदा, शहादा, शिरपूरमार्गे तर धुळ्याकडून येणारी वाहने सोनगीर, दोंडाईचा, शहादा, तळोदा, कुकरमुंडा, उच्छलमार्गे वळविण्यात आली आहे. धुळ्याकडून ये-जा करणारे कार, जीप, एस.टी. बस व शालेय बस या वाहनांना धुळे, साक्री, पिंपळनेर, चरणमाळमार्गे वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद झाल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी रायंगण व वजीरपाडा येथे भेटी दिल्या. आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जि.प.चे माजी सदस्य रमेश ठाकूर गावीत, रायपूरचे सरपंच ईश्वर गावीत उपस्थित होते. वजीरपाडा येथे नदीपात्रात असलेले विद्युत ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तेथे विद्युत पुरवठा पूर्ववत करणे आवश्यक आहे. तालुक्यातील प्रमुख नद्यांसह इतर नद्या व नाल्यांना आलेला पूर शनिवारी ओसरल्याने ग्रामीण भागातील रोखण्यात आलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली. लगतच्या जिल्ह्यातील विविध आगारांच्या बसेसही सुरत, वापी व नवसारीकडे आज धावल्या.
नवापूर : जनजीवन पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:38 PM