लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले संभाषण वारंवार ऐकवून बदनामी केली व वेळोवेळी पैशांची मागणी केली या कारणावरून जिल्हा परिषद शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नवापाडा, ता.नवापूर येथे घडली. याप्रकरणी शिक्षक असलेल्या एकासह महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयतु काबुडय़ा कोकणी (58) रा.नवापाडा, ता.नवापूर असे मयताचे नाव असून ते तारापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या डायरीत ही बाब उघड झाली आहे. मयत कोकणी यांचे संभाषण त्यांच्यात शाळेत शिक्षक असलेले आयुब गफारखान पठाण रा.विसरवाडी यांनी मोबाईलवर रेकॉर्ड केले होते. ते संभाषण त्यांनी वेळोवेळी त्यांच्यासह इतरांना ऐकवले होते. यामुळे आपली बदनामी होत असल्याची सल त्यांनी होती.शिवाय तारापूरमध्येच राहणा:या मंदाकिनी संदीप वळवी यांनी देखील कोकणी यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली व विविध माध्यमातून त्रास दिला. त्याला कंटाळूनच त्यांनी गळफास घेतल्याचे कोकणी यांचा मुलगा योगेश कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून जिल्हा परिषद शिक्षक आयुब गफारखान पठाण व मंदाकिनी संदीप वळवी यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पाटील व फौजदार बि:हाडे करीत आहे. दरम्यान, शिक्षक आयुब गफारखान पठाण यास अटक करण्यात आली आहे.
जाचाला कंटाळून नवापाडा येथील शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:32 PM