शहादा : केंद्र सरकारने हजार व 500 रुपयांच्या नोटा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. निर्णय चांगला असला तरी नियोजन चुकल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहादा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 50 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतरही देशातील गरीब जनतेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकांच्या बाहेर अद्यापही रांगा कमी झालेल्या नसून अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. शेतमालाचा भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने 50 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येणार असल्याचे सांगितले होते. त्यापेक्षा जास्त दिवस लोटल्याने परिस्थिती सुधारली नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे आक्रोश मोर्चाद्वारे केंद्र शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माधव गोविंद पाटील, डॉ.आनंद बन्सीलाल पाटील, लोणखेडय़ाचे माजी उपसरपंच हरी लिमजी पाटील, जिल्हा सरचिटणीस शांतीलाल पाटील, सरपंच काशिराम ठाकरे, धरमसिंग पावरा, सुरेंद्र कुवर, चैत्राम ठाकरे, आपसिंग पावरा, आधारसिंग गिरासे, भाईदास वसावे, लालसिंग पवार, विनोद मोरे, जगदीश पाटील, रतीलाल पवार, विजय वळवी, विजय वाघ, जुत्या ठाकरे, दिनेश खर्डे, गणेश वळवी, दिनेश वाघ, दिनेश पाटील, ब्रिजलाल पावरा, सुकदेव वळवी, दिलीप पावरा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)नंदुरबार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेही निवेदन4राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेदेखील नोटाबंदीविरुद्ध जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने नोटबंदीचा निर्णय जाहीर करून 50 दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरीही सर्वसामान्य जनतेला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. शेतीमालाचा भाव कोसळल्याने शेतकर अडचणीत आले आहेत. शासनाने 50 दिवसात परिस्थिती सुधारेल असे जाहीर केले होते. परंतु त्यात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आक्रोश मोर्चाद्वारे आंदोलन करून केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, विश्वनाथ वळवी, अमोल भारती, जितेंद्र मराठे, राजेंद्र पाटील, युनूस पठाण, महेंद्र चौधरी, संजू सोनवणे, प्रवीण पाटील, वामन पिंपळे, योगेश ठाकरे, रवींद्र सोनवणे, शेख शब्बीर शेख आदी उपस्थित होते.
शहाद्यात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा
By admin | Published: January 09, 2017 10:54 PM