नंदुरबार : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेता पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त माध्यमाने धडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय ब्लॅक स्पॉटचेही सव्र्हेक्षण करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेकांचा जीव गेला आहे. ही बाब लक्षात घेता ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा बैठकीत देण्यात आले होते. त्यानुसार येत्या काळात कारवाईला सुरुवात होणार आहे. शासनाने आता नवीन मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाईचे निर्देश दिले आहेत. विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणा:यास एक हजार रुपयांचा दंड अकारण्यात येईल. लाल सिगAल ओलांडून जाणा:यास 200 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यास व वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर केल्यास देखील 200 रुपयांचा दंड अकारला जाणार आहे. या तरतुदींनुसार वाहनमालकावर देखील कारवाई होणार आहे. प्रसंगी वाहनाची अनुक्षप्ती तीन महिन्यांकरीता निलंबीत करण्यात येणार आहे.ब्लॅक स्पॉटचे सव्र्हेक्षणज्या रस्त्यांवर नेहमी अपघात होतात अशा ठिकाणांचा शोध घेवून त्या ठिकाणी रिप्लेक्टर बसवणे, मेटॅलिक पावडर, साईनबोर्ड लावण अशा उपाययोजना कराव्या. ज्या रस्त्यांवर विशेषत: महामार्गावर बाईक स्टंट करून करणा:या युवकांचा व्हिडीओ पोलिसांकडे पाठविल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वाहनधारकांना टेललॅम्प व रिप्लेक्टर हे दोन्ही महत्वाचे असून ते वाहनास सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. हेल्मेटसक्ती, मोबाईल वापर, अल्कहोल टेस्ट याबाबत मोहिम राबविण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ब्लॅक स्पॉटचे नव्याने सव्र्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:48 PM