शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नवापूरात आंतरराष्ट्रीय परिषद : आदिवासी हेच या जगाचे खरे रहिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचा मोठा हिस्सा सांस्कृतिक स्तरावर संपन्न आहे. असे असतांनाही हा वर्ग मुख्य प्रवाहापासुन दुर असल्याचे मत आमदार सुरूपसिंग नाईक यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर आयोजित परिषदेत अध्यक्षस्थानावरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचा मोठा हिस्सा सांस्कृतिक स्तरावर संपन्न आहे. असे असतांनाही हा वर्ग मुख्य प्रवाहापासुन दुर असल्याचे मत आमदार सुरूपसिंग नाईक यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर आयोजित परिषदेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.  परिषदेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष नाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष  डॉ. पी. डी. देवरे, नागपूरचे डॉ. मोहन काशिकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील, संस्थेचे मानद सचिव अजित नाईक, तानाजीराव वळवी, सहसचिव मधुकर नाईक, अजय पाटील, संचालक विनोद नाईक, जी. के. पठाण, अमृत पाडवी, डॉ. शुभदा ठाकरे, नेपाळच्या डॉ. इंद्रा अधिकारी, डॉ. निर्मला उपरेती, बांगलादेशचे डॉ. खसरुल आलम कुद्दुसी काझी  व्यासपीठावर उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या विकासाचे चित्र जागतिक संशोधनाचा विषय झाला आहे याचे समाधान असल्याचे सांगून आमदार नाईक पुढे म्हणाले, आदिवासी हे या जगाचे खरे रहिवासी आहेत. जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग त्यांनी व्यापला असल्याचे ते म्हणाले. शिरीष नाईक यांनी  पर्यावरण पुरक सांस्कृतिक ठेवा जतन करूनही आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासुन आजही लांब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. मोहन काशिकर यांनी सांगितले, भारताचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण अनेक अंगांनी सातत्याने बदलत आहे. आधुनिक काळात बदलती परिस्थिती लक्षात घेता घटनात्मक बदल अपेक्षित असल्याचे सांगून बदलाची ही प्रक्रिया स्थानिक पातळीवरुन झाल्यास राजकारणात सकारात्मक बदल शांततेत घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक काळात सध्याच्या शासनाने क्रांतीकारक बदल सुचवून विकासाचे धोरण लाऊन धरले असले तरी गत 60 वर्षाचा विकासाचा पाया विसरुन चालणार नाही असे डॉ. पी. डी. देवरे यांनी सांगितले. नवापूर तालुक्यासह जिल्ह्यातील आदिवासी जनतेचा झालेल्या विकासात अधिकची भर टाकण्याची गरज व्यक्त करतांना  विकासाची ही गरज अविकसित भागासाठी आवश्यक असल्याचे मत डॉ. गिरीष राणा यांनी व्यक्त केले.  याप्रसंगी परिषदेत सादर झालेल्या संशोधन पेपरचे संकलन केलेले ट्रायबल कम्युनिटी अॅण्ड सोशियो पॉलिटीकल थॉट, रिसेंट पॉलिटीकल डेव्हलपमेंट इन इंडिया, परिषद स्मरणिका व विचार मंथन या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल यांनी प्रास्तविक करुन अतिथींचे स्वागत केले. स्वागतपर मनोगत परिषदेचे संयोजक उपप्राचार्य ए. बी. महाजन यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. आय. जी. पठाण व प्रा. सुरेखा बनसोडे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. वाय. जी. भदाणे यांनी आभार मानलेत.