लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख अधिकारी नवीन असतांना आणि विशेष म्हणजे चारही निवडणूक निर्णय अधिकारी महिनाभरापूर्वीच बदलून आलेले असतांना देखील निवडणूक मुक्त वातावरणात पार पडल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाले. मतदानादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. कुठेही निवडणुकीत विस्कळीतपणा आल्याचे दिसून आले नाही. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे निवडणुकीच्या दोन महिन्याआधीच बदलून आल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी येवून ठेपली होती. परंतु आपल्या प्रशासकीय कामाच्या अनुभवावरून त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे हाताळली. याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखील जिल्हाधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली. लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्हा सर्वाधिक मतदानाबाबत राज्यात दुस:या क्रमांकावर होता. विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकावर यावा यासाठी धडपड होती. राजकीय आणि इतर चित्र पहाता 50 टक्केही मतदान होते की नाही अशी स्थिती असतांना तब्बल 66.37 टक्केर्पयत मतदान नेण्यार्पयत यश आले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकुण 70.35 टक्के मतदान झाले होते. आता 66.37 टक्के झाले. निवडणूक निर्णय अधिकारीजिल्ह्यातील चारही निवडणूक निर्णय अधिकारी हे नव्याने जिल्ह्यात आलेले आहेत. नंदुरबारच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील या यापूर्वी नंदुरबारात उपजिल्हा निवडणूक अधिकारी होत्या. त्यांनी त्यांच्या त्या अनुभवाच्या जोरावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पाडली.नवापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यापूर्वी नंदुरबार तहसीलदार होते. शिवाय नवापूर येथे पर्यावेक्षाधिन तहसीलदार देखील होते. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी नवापूरची निवडणूक पार पाडली. शहाद्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे हे मात्र, जिल्ह्यासाठी नवीनच होते. तरीही त्यांनी स्थानिक अधिका:यांच्या मदतीने शहाद्याची निवडणूक पार पाडली. अक्कलकुवाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील यापूर्वी नंदुरबारात तहसीलदार होते. त्यांनी देखील जिल्ह्यातील कामाच्या अनुभवाच्या जोरावर अक्कलकुवाची निवडणूक पार पाडली.
नवीन अधिका:यांनी लिलया पेलले निवडणुकीचे शिवधनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:53 PM