लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले साई इन्व्हर्टर बॅटरी व मोबाइल दुकान रात्री 2 वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी फोडले. यात तीन नवीन मोबाईल तसेच दुरुस्तीसाठी आलेले 4 मोबाईल व दोन हजार रुपये असे 32 हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला असल्याची माहिती आह़े नवापूर शहराच्या भर वस्तीत असलेले हे दुकान पोलीस स्थानकापासून केवळ 200 मीटर अंतरावर आहे. तरीदेखील दुकान फोडण्याचे धाडस चोरटय़ांनी केल्याने परिसरातील दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े यामुळे पोलिसांपुढेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शहरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवडय़ात मंगलदास पार्क येथेही चोरटय़ांनी घर फोडले होते. तेथील रहिवासी श्री़ कोठावदे यांच्या घरातून 85 हजाराचा ऐवज चोरीस गेला होता. आता तर मेनरोडावर असेलेले साई इन्व्हर्टर बॅटरी व मोबाईल शॉप चोरटय़ांनी फोडले आहे. यापूर्वी या भागात अमिन मोबाइल शॉप या दुकानवरचे पत्रे तोडून चोरीचा प्रय} झाला होता. लगतच असलेल्या किराणा दुकानात दोन वेळा चोरी झाली होती. साई इन्व्हर्टर बॅटरी व मोबाइल दुकानात ही दुस:यांदा चोरी झाली आहे. या मार्गावरील व्यापारी व रहिवाशी 2014 पासून सीसीटीव्ही बसविण्याची मागणी करीत आहेत़ मात्र आज पर्यत या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले नसल्याने व्यापारी व रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी दुकानाचा पंचनामा केला असून दुकानाच्या मागील भागातील छतावरील दोन पत्रे उघडून चोरांनी दुकानात प्रवेश केला आहे. दुकानात चोरटय़ांच्या पायाचे ठसे उमटले आहे. या घटनेची फिर्याद दुकानदार अविनाश उदेसिंग पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. शहरातील मंगलदास पार्क, जनता पार्क सारख्या उच्चभ्रु भागात बंद घरे फोडण्याचे व मोटार सायकली लंपास होण्याच्या घटना गतकाळात घडल्या आहेत. त्यामुळे चोरटय़ांनी पुन्हा आपले डोके वर काढले असल्याने पोलिसांपुढे समस्या निर्माण झाली आह़े तसेच चोरटय़ांना जेरबंद करण्याचे आव्हान निर्माण झाले आह़े
नवापूरात 32 हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:20 PM