शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

शेवटच्या दिवशी नामनिर्देशनाची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:50 PM

लोकनियुक्त सरपंचपदासाठी 167 इच्छुक : सदस्यपदासाठी 925 उमेदवाराचे अजर्

ठळक मुद्देनंदुरबार तालुक्यात चार ग्रा़प बिनविरोध नंदुरबार तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या 16 लोकनियुक्त सरपंच पदासाठी 56 तर 144 सदस्य पदांसाठी 311 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत़ तालुक्यातील कानळदा, सातुर्के, ओसर्ली आणि करणखेडा या ग्रामपंचायती बिनविरोध हो

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर/शहादा/अक्कलकुवा/ नंदुरबार : 51 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत शुक्रवारी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चारही तालुका मुख्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती़ गर्दीमुळे तहसील कार्यालयांना यात्रेचे स्वरूप आले होत़े   अक्कलकुवा, शहादा, नवापूर, आणि नंदुरबार या तहसील कार्यालयांमध्ये सकाळी 10 वाजेपासून कामकाज सुरू होताच, विविध राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेल्या पॅनलचे सरपंच आणि सदस्य पदासाठी इच्छुक यांच्याकडून नामनिर्देशन दाखल करण्याची चढाओढ सुरू होती़    शुक्रवारी दिवसभरात 51 ग्रामपंचायतींच्या 504 सदस्यपदासाठी 925 तर 51 लोकनियुक्त सरपंच पदासाठी 167 इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केल़े तत्पूर्वी गुरूवारी 51 ग्रामपंचायतीत 185 प्रभागाच्या 504 जागांसाठी 208 तर सरपंच पदासाठी 27 नामनिर्देशन दाखल होत़े गुरूवारी सुटी रद्द झाल्याची माहिती नसल्याने केवळ नंदुरबार तालुक्यात 21 तर नवापूर तालुक्यात 26 नामनिर्देशन दाखल झाले होत़े शुक्रवारी शेवटच्या दिवशी यात चारपट वाढ झाली़ राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पॅनलप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी त्या-त्या तहसील कार्यालयांत हजेरी लावत आपपल्या पॅनलच्या इच्छुक सदस्य आणि सरपंच यांचे नामनिर्देशन निवडणूक अधिका:यांच्या सूपूर्द केल़े नवापूरतालुक्यात 12 ग्रामपंचायतीच्या  108 सदस्य आणि 12 लोकनियुक्त सरपंचपदासाठी एकूण 323 नामनिर्देशन दाखल करण्यात आले होत़े  लोकनियुक्त सरपंचपदासाठी 51 तर सदस्य पदासाठी 271 नामनिर्देशन दाखल करण्यात आल्याची माहिती आह़े यातही गंगापूर आणि वाटवी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े अक्कलकुवातालुक्यात  15 ग्रामपंचायतीच्या 276 सदस्यपदासाठी 350 आणि लोकनियुक्त सरपंच पदासाठी 45 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले होत़े तालुक्यातील मोलगी, भगदरी, खापर आणि अक्कलकुवा या चार मोठय़ा ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करणा:या इच्छुकांची गर्दी झाल्याने याठिकाणी रात्री उशिरार्पयत गर्दी होती़ मोलगी ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 63 तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी 17 इच्छुकांनी नामनिर्देशन दाखल केल्याची माहिती देण्यात आली आह़े  शहादातालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या 21 लोकनियुक्त सरपंच तर 46 सदस्यपदासाठी 87 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ यात कळंबू येथे लोकनियुक्त सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी 17, खैरवे-भडगाव येथे सरपंच पदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 15, निंभोरा सरपंच 2 आणि सदस्य पदासाठी 14, बिलाडी त़ह येथे सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 13, धांद्रे येथे सरपंच पदासाठी सात आणि सदस्य 12, बहिरपूर 3 सरपंच तर सदस्यपदासाठी 13 नामनिर्देशन दाखल झाले होत़े यापूर्वी दोन अर्ज सरपंच आणि चार सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले होत़े आता लक्ष माघारीकडे लागले आह़े