शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच व्हावी

By admin | Published: April 01, 2017 4:57 PM

सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे.

 

27 वर्षापासून विकासाचा पाठपुरावा : सातपुडाही मुख्य प्रवाहात येत असल्याचा आमदारांना विश्वासनंदुरबार : सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे. येथील अनेक प्रश्न कायद्याच्या गुंतागुंतीत अडकल्याने त्याच्या पाठपुराव्यासाठी  अधिक वेळ द्यावा लागला असला तरी कायद्याचे अडथळे दूर झाल्याने विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षातच सातपुडा निश्चितच पुर्णत: बदलून समाजाच्या मुख्य प्रवाहात विकासाच्या पथावर वाटचाल करतांना दिसेल असे मत    आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार अॅड.पाडवी यांनी विविध बाबींवर दिलखुलास चर्चा केली. त्यांनी सांगितले, आपण विद्यार्थी दशेपासून संघटनात्मक काम करीत आहोत. नंदुरबारातील जीटीपी महाविद्यालयात शिकत असताना विद्यापीठाच्या सी.आर.पदासाठी थेट निवडणूक लढविली. त्यावेळी केवळ एका मताने आपला पराभव झाला. आदिवासी दुर्गम भागातून येणारा युवक एवढे यश मिळवू शकतो ही भावना प्रबळ झाली आणि तेथून आपल्या संघर्षमय जिवनाला सुरुवात झाली. संघर्षाला सुरुवातयाच काळात अर्थात 1977 मध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. तिचे नेतृत्व माङयाकडे देण्यात आले. या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्याचे अनेक प्रश्न, समस्या सोडविता आल्या, त्यांना न्याय देता आला. त्यानंतर एलएलबीसाठी पुणे येथे गेलो. या माध्यमातून सेवादलाच्या लोकांशी तसेच अनेक प्रभावी राजकारणी, विचारवंत यांच्याशी संपर्क आला. विद्यापीठ नामांतर लढय़ात रामदास आठवले यांच्यासोबत तुरुंगात गेलो. धुळे येथे वकिलीची प्रॅक्टीस करीत असताना 1989 मध्ये जनता दलातर्फे थेट लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळाले. कुठलीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना केवळ तरुणाईच्या पाठबळावर आणि स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सहकार्याने पहिल्याच निवडणुकीत तब्बल एक लाख 35 हजार मते मिळविली. हाच प्रचार आणि अनुभव 1990 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कामी आला. जनता दलातर्फेच अक्राणी मतदारसंघात निवडणूक लढवून मोठय़ा मताधिक्याने विजयी झालो. तेव्हापासून सातपुडय़ाचे  प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी अंगावर आली. लोकांची केलेली कामे, जोडून ठेवलेल्या कार्यकत्र्याच्या बळावर आपण 27 वर्षापासून या भागाचे नेतृत्व करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.