शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

रहिवासी एनए जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याने 700 जणांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 4:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  अकृषक जमिनीवर घर बांधकामासाठी परवानगी घेत प्रत्यक्षात मात्र त्यावर व्यावसायिक इमारती उभ्या करून वापर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  अकृषक जमिनीवर घर बांधकामासाठी परवानगी घेत प्रत्यक्षात मात्र त्यावर व्यावसायिक इमारती उभ्या करून वापर करणाऱ्या ७०० जणांना जिल्ह्यात नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा मिळाल्यानंतर यातील ९० जणांनी दंड भरून रितसर व्यवसाय परवाने घेतले असले तरी अद्याप ६०० जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे.महसूल विभागाकडून एनए जमिनी करून देत त्यावर रहिवास आणि व्यावसायिक वापरासाठी परवाने देण्यात येतात. यासाठी वेगवेगळ्या दरातून महसूल आकारणी करण्यात येते. रहिवासासाठी दर कमी असल्याने अनेकांकडून रहिवास एनए प्लॉट नोंदणी करून मंजुरी मिळवून घेत त्यावर व्यावसायिक इमारती उभारून व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार होत होते. यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत होता. ही बाब विभागाला समजून आल्यानंतर तलाठ्यामार्फत तालुकास्तरावर तपासणी सुरू होती. याअंतर्गत जुलै २०२० अखेरीस एकूण ५०६ प्रकरणे समोर आली होती, तर ऑगस्ट २०२०अखेर एकूण २१६ प्रकरणे समोर आली होती. एकाच वर्षात एकूण ७२२ प्रकरणे समोर आल्यानंतर महसूल विभागाने संबंधिताना नोटिसा बजावत दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आदेशांना बहुतांश व्यावसायिक वापरकर्त्यांनी केराची टोपली दाखवली होती. परिणामी महसूल विभागाकडून पुन्हा नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नोटिसा मिळाल्यानंतर मात्र ९० जणांनी नऊ लाख ८० हजार रुपयांचा दंड शासनाकडे जमा केला आहे. त्यांच्याकडे एकूण २१ हेक्टर ५० आर जमिनीचा दंड प्रलंबित होता. यानंतर संबंधितांनी व्यावसायिक परवाने घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.

   १७२ हेक्टर गैरवापर  दुसरीकडे आजअखेरीस जिल्ह्यात एकूण ७२२ जणांना प्रशासनाने नोटिसा दिल्या असून, त्यांच्याकडून १७२ हेक्टर ४७ आर जमिनीचा रहिवास परवाना घेत व्यावसायिक वापर होत असल्याचे दिसून आले होते. प्रशासनाने गेल्या वर्षात जुलै व ऑगस्ट अखेर अशा दोन टप्प्यात याबाबत सर्वेक्षण केले होते. 

   नंदुरबारात सर्वाधिक  नंदुरबार तालुक्यातील ३०७ जणांकडून ६७ हेक्टर, नवापूर तालुक्यातील १०० जणांकडून ७ हेक्टर, तळोदा तालुक्यातील ५७ जणांकडून ३४ हेक्टर, अक्कलकुवा तालुक्यात ७४ जणांकडून ५ हेक्टर, शहादा तालुक्यातील १८४ जणांकडून ५७ हेक्टर जमिनीचा रहिवास परवाना घेत गैरवापर होत असल्याचे समोर आले होते.

धडगाव तालुक्यात एकही प्रकरण नाही :  सर्वांना तहसील कार्यालय स्तरावरून नोटिसा दिल्यानंतर तपासणी सुरू आहे. विशेष बाब म्हणजे धडगाव तालुक्यात असे एकही प्रकरण समोर आलेले नाही.

योग्य प्रकारे परवाने न घेता प्रशासनाची दिशाभूल करणा-यांना नोटीसा यापूर्वी बजावल्या होत्या. काहींनी दंड भरला आहे. दंड न भरणा-यांना पुन्हा नोटीसा देवून संधी दिली जाईल. त्यांच्याकडून खुलासा किंवा दंडाची कारवाई न झाल्यास थेट त्यांच्या सातबा-यावर बोजा चढवला जाईल. रहिवासी परवाना असल्यास नागरीकांनी त्यानुसारच बांधकाम करुन वापर करावा. -भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, नंदुरबार.