लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाच अधिकारी परवाणगी न घेता सभेस उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत ठरविण्यात आले. दरम्यान, सभेत शिक्षण व आरोग्य या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद स्थायी समिती सभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या. उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन यांच्यासह सर्व विषय समिती सभापती उपस्थित होते. सभेस अनेक प्रमुख अधिका:यांची अनुपस्थिती असल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पाच अधिकारी हे शासकीय कामांसाठी बाहेरगावी गेले आहेत. परंतु सभेस अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी अध्यक्षांची परवाणगी घेतलेली नव्हती. केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवाडे हे पुणे येथे बैठकीसाठी गेले आहेत. तशी माहिती सभागृहाला होती तर पशुसंवर्धन अधिकारी यांचा रजेचा अर्ज होता. याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी अरुण पाटील हे पुणे येथे बैठकीसाठी. मुख्य लेखा व वित्त अधिकारी लिंगनवाड हे न्यायालयीन कामकाजासाठी, डीआरडीएचे जालिंदर पठारे बैठकीसाठी तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे मुंबई येथे बैठकीसाठी गेले आहेत. त्याबाबत अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला असता बी.एम.मोहन यांनी सांगितले, अध्यक्षांना पूर्व कल्पना न देता किंवा परवाणगी न घेता सभेला गैरहजर राहता येत नाही. त्यामुळे त्यांना नोटीसा देवून खुलासा मागविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी रोषमाळखुर्द केंद्राअंतर्गत काही शाळांना भेटी दिल्या होत्या. त्यातील 17 शाळांवर शिक्षक जात नसल्याचे उघड झाले. मांडय़ापाडा शाळेत एप्रिल महिन्यापासून मुख्याध्यापक जात नाहीत. कागदपत्रे देखील घेवून गेले आहेत. चौथी पास झालेल्या विद्याथ्र्याना दाखले दिले नाहीत. त्यांचा पगार जूनर्पयत काढण्यात आलेला आहे हे विशेष असल्याचे नाईक यांनी सांगितले. या भागात दोन शिक्षक हे शाळांवर आठवडय़ाच्या डय़ुटय़ा लावलेल्या आहेत. त्यामुळे शाळा एक शिक्षकीच असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिक्षकांसोबतच संबधित अधिका:यांवरही कारवाई करावी व खुलासे मागवावे अशा सुचना त्यांनी केल्या. विशेष कृती आराखडय़ातील अपुर्ण कामे पुर्ण करण्याच्या सुचना अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिल्या. 662 पैकी 231 कामे अपुर्ण असून त्यात अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्रांचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
विनापरवाणगी गैरहजर राहणा:या अधिका:यांना नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:34 PM