लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : सात किमी करावी लागणारी पायपीट रोखण्यासाठी येथील विद्याथ्र्यानी स्वता श्रमदानाच्या माध्यमातून तळोदा ते तुळाजा मार्गावरील खड्डयांवर भराव टाकला़ व रस्त्यांची झालेली दुरावस्था हे कारण सांगत आगाराकडून बंद करण्यात आलेल्या बसफे:या आता पुन्हा करण्याची अपेक्षा व्यक्त केली़गेल्या काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा आगाराकडून तळोदा तालुक्यातील रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े त्यात ज्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाले आह़े त्या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार तळोदा-तुळाजा आदी बहुतेक मार्गावरील बसफे:या बंद करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे तुळाजा गावातील विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े त्यामुळे त्यांना तळोद्याला येण्यासाठी सात किमीर्पयत पायपीट करावी लागत होती़ त्यामुळे विद्याथ्र्यानी प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट न बघता स्वता श्रमदानाच्या माध्यमातून संबंधित मार्गावरील खड्डयांवर भराव टाकला आह़े त्यामुळे विद्याथ्र्यानी घेतलेल्या या पुढाकारामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आह़े तर दुसरीकडे हे काम करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े एसटी बस तुळाजार्पयत जात नसल्याने विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े त्यामुळे त्याच्या पालकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ पावसाळा सुरु असल्याने रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत़ तसेच काही ठिकाणी रस्तेच नसल्याचीदेखील स्थिती आह़े त्यामुळे या सा:याचा विचार करुन तसेच चालक व वाहन यांच्या आरोग्याचा विचार करुन अक्कलकुवा आगाराकडून दुरावस्था झालेल्या मार्गावर बससेवा बंद करण्यात आली होती़ तसेच अगोदर रस्ते व्यवस्थित करा व नंतर बससेवेची अपेक्षा करा असे संबंधित गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सांगण्यात आले होत़े परंतु यातून विद्यार्थी व दैनंदिन प्रवास करणा:या ग्रामस्थांचे, मजुरांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े विद्यार्थ्यच्या शैक्षणिक जीवनावरही याचा विपरित परिणाम होताना दिसून येत होता़ त्यामुळे या सर्वावर मार्ग म्हणून गावातील विद्यार्थी व युवकांनीच पुढाकार घेऊन प्रशासनाच्या भरवश्यावर न राहता श्रमदानातून मार्गावर भराव टाकण्याचा तोडगा काढला आह़े