लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करून राजेंद्र वसावे यांनी यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसह भाजीपाला व मशरूमची मोठ्या प्रमाणावर लागवड करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पारंपारिक असलेला खपली व बन्सी गहूचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले.अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडयासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांना राजेंद्र वसावे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्यामुळे सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सेंद्रीय शेतीकडे आकृष्ट होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून अन्नधान्य तसेच भाजीपाल्याची निर्मिती सुरू केली असून, त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदादेखील झाला आहे. रब्बी हंगामात सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात तसेच परराज्यातही सेंद्रीय शेतीसाठी पारंपरिक बियाण्यांची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः पारंपारिक आणि आरोग्याला पोषक असलेले सेंद्रीय पद्धतीने तयार केलेला खपली गहू त्यांनी जिल्ह्यामध्ये विक्री केला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे उपलब्धतेनुसार त्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र या खपली गहूची मागणी जास्त असल्या कारणामुळे ती पूर्ण करता येऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या खपली गव्हाचे बियाण्यांबाबत मार्गदर्शन करणार असल्याचेही राजेंद्र वसावे यांनी सांगितले.
रब्बी हंगामात सेंद्रीय शेती करू इच्छिणार्या शेतकऱ्यांसाठी पारंपारिक खपली तसेच बन्सी गव्हाचे लागवडीबाबत व उत्पादनाबाबत पूर्णपणे मार्गदर्शन करण्याचे शेतकरी वसावे यांनी सांगितले. सर्व पारंपारिक कडधान्याच्या बियाण्यांबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सेंद्रीय शेतीतून उत्पादीत झालेले धान्य व भाजीपाला विक्रीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक फायदा करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत अक्कलकुवा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये सेंद्रीय बियाणे व खतांच्या नावावर अनेक बनावट कंपन्या व त्यांचे वितरक गावोगावी वेगवेगळे आमिषे दाखवून शेतकऱ्यांची व तरुणांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यापासून सावध राह
खपली गहू हा पारंपारिक असून, शरीरातील अनेक विकारांना घालवणारा आहे. शरीरातील अनेक अवयवांना मजबूत करण्याचे कार्य याच्या सेवनातून होते. दुर्मिळ असलेल्या या गव्हाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
- भगतसिंग पाडवी, निवृत्त विक्रीकर अधिकारी