लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील नर्मदानगर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनियमितता व शालेय पोषण आहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे.याबाबत निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सहावीर्पयतचे वर्ग आहेत. ही शाळा पाच शिक्षकी शाळा असून, पूर्ण शिक्षक कधीच येत नाही. त्यातही मुख्याध्यापक व त्यांची प}ी शिक्षिका म्हणून येथे कार्यरत आहेत. मुख्याध्यापक आपल्या पदाचा सतत दुरूपयोग करतात. शिवाय त्यांच्या पदाच्या फायदा आपल्या प}ी शिक्षिका याही नेहमी करीत असतात. त्या कधी तरी शाळेत येतात व हजेरी मस्टरवर गैरहजर असताना सह्या करतात, असा अरोप निवेदनात केला आहे.हे दाम्पत्य गैरहजर राहतात. साहजिकच आमच्या विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शिक्षण व्यवस्थापन समितीने मुख्याध्यापकांना जाब विचारला तर समाधानकार उत्तर देण्याऐवजी उडवा-उडवीचे उत्तरे देतात. याबाबत वरिष्ठ अधिका:यांशी तक्रार केलेली असताना अजूनही जैसे थे परिस्थिती आहे.29 व 31 ऑगस्टच्या दिवशी मुख्याध्यापकांनी विद्याथ्र्याच्या शालेय पोषण आहाराचा सहा क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विकून टाकला. त्यांनी मला तांदूळ विकण्याचे विचारले होते. मात्र मी स्पष्ट नकार दिला होता. या उपरांतही त्यांनी शालेय व्यवस्थापन पदाधिका:यांचे ऐकले नाही. त्यांच्या मनमानी कारभारामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच. शाळेची शिस्त देखील बिघडत आहे. त्यामुळे याप्रकरणी आपण चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुवा:या वसावे, ग्रामपंचायत सदस्य पुन्या वसावे, किर्ती वसावे यांनी केली आहे.
नर्मदानगर शाळेत पोषण आहार अनियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:43 AM
शालेय व्यवस्थापन समितीची तक्रार : जिल्हाधिका:यांनी घेतली दखल
ठळक मुद्देजिल्हाधिका:यांचे चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेतील शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभार व शिक्षकांच्या अनियमितते प्रकरणी व्यवस्थापन समितीच्या पदाधिका:यांनी मंगळवारी प्रत्यक्ष जिल्हाधिका:यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार