ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 23 - छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवितांना शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांच्या आदेशाला न जुमानल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्यासह दिडशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबारात पालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा वाद सुरू आहे. पुर्वीच्याच जागेवर पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेने वर्षभरापासून आंदोलन सुरू ठेवले. रविवारी सेनेनेच पुतळा आणून तो त्या जागेवर बसविला. यावेळी पोलिसांनी विरोध केला असता वाद झाला. पोलिसांनी पुतळा परत केल्यावर त्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आला. याप्रकरणी हवालदार विजय बोरसे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या लेखी आदेशाला न जुमानता रॅली काढणे, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे, धमकी देणे व सरकारी कामात अडथळा आणणे या प्रकरणी सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, शाम मराठे, चारूदत्त कळवणकर, देवेंद्र जैन, अर्जून मराठे, नरेंद्र पाटील यांच्यासह दीडशे कार्यकर्त्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहे.
सरकारी कामात अडथळा, सेनेच्या जिल्हाप्रमुखांवर गुन्हा
By admin | Published: January 23, 2017 9:38 PM