मंदाणे : अपूर्ण चलन पुरवठा व अपूर्ण कर्मचा:यांमुळे मंदाणे, ता. शहादा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. सोमवारी संतप्त झालेल्या वृद्ध महिला व पुरुष ग्राहकांनी दिवसभर बँकेसमोर ठिय्या मांडला होता.मंदाणे येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. गावात दुस:या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसल्याने मंदाणेसह परिसरातील नागरिकांचे याच बँकेत खाती आहेत. त्यात शासनाच्या संजय गांधी निराधार व इतर योजनांचे लाभार्थी, अपंग वेतन, ज्येष्ठ नागरिक, निवृत्ती वेतनधारक, शासकीय कर्मचारी, शिक्षक, शेतकरी, व्यापा:यांची या बँकेच्या शाखेत मोठय़ा प्रमाणावर खाती आहेत. या बँकेच्या शाखेत आधीच अपूर्ण कर्मचारी असून, कामकाजासाठी पुरेशी जागा नसल्याने ग्राहकांचे प्रचंड हाल होतात. त्यातच 500 व एक हजाराच्या नोटबंदीमुळे भर पडली आहे. या बँकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना दिवसभर थांबूनही अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नाहीत. परिणामी ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होऊन बाहेरील गावांच्या नागरिकांना येण्या-जाण्याचा आर्थिक भरुदडही सहन करावा लागतो.मंदाणे येथे सुरू असलेल्या शाकंभरी मातेच्या यात्रेनिमित्त येथे प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार नितीन गवळी उपस्थित होते. त्यांच्याकडे बँकेतून पुरेसे व वेळेवर पैसे मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या येथील शाखा व्यवस्थापकांना ग्राहकांना पुरेसा चलन पुरवठा करण्यात यावा, याबाबत सूचना दिली होती. परंतु बँकेला अपूर्ण चलन पुरवठा होत असल्याने व कर्मचा:यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांचे हाल सुरूच आहेत. सध्या मंदाणे येथे यात्रोत्सव सुरू असल्याने नागरिकांना पैशांची गरज आहे. त्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे.या बँकेतून पैसे काढण्यासाठी होणा:या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी दिवसभर बँकेच्या आवारातच ठिय्या मांडला होता. ग्राहकांचे होणारे हाल पाहता या बँकेला पुरेसा चलन पुरवठा व कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)आम्ही सकाळपासून येथे बसून आहोत. परंतु गर्दी जास्त असल्याने व एकच रांग असल्याने हाल होत आहेत.-जायसाबाई भिल, माजी सरपंच व ग्राहक.बँकेत पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने अडचणी येत आहेत. बँकेला जसजसा चलन पुरवठा होत आहे तसतशी रोख रक्कम देण्याचा आमचा प्रय} आहे. वरिष्ठांनाही वेळोवेळी कळवून चलन पुरवठा वाढविण्याबाबत मागणी केली जात आहे. रक्कम उपलब्ध झाल्यास रात्री आठ वाजेर्पयत बँक सुरू असते.-अनिकेत मंडळ, प्रभारी शाखा प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, मंदाणे
वृद्ध खातेदारांचा बँकेसमोर ठिय्या
By admin | Published: January 16, 2017 11:52 PM