लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : होमगार्डच्या 301 जागांसाठी जिल्ह्यातील कानाकोप:यातून तब्बल दीड हजारापेक्षा अधीक उमेदवारांनी हजेरी लावली. पहिल्या दिवशी कागदपत्रांची पडताळणी करून काही उमेदवारांच्या शाररिक चाचण्या घेण्यात आल्या. शुक्रवार, 30 रोजी ही प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, भरतीसाठी महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि परिसरातील रस्ते काही काळापुरते बंद करण्यात आले होते.नंदुरबार जिल्हा होमगार्ड दलात रिक्त पदाची मोठी डोकेदुखी होती. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार 301 जागांसाठी भरती प्रक्रियेला मंजुरी मिळविण्यात आली. ती प्रक्रिया गुरुवारी पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली. सुरू करण्यात आली. 301 जागांमध्ये 237 पुरुष तर 64 महिला होमगार्ड जवानांचा समावेश राहणार आहे. खुल्या पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस कवायत मैदानावर गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. काही उमेदवार बुधवारी रात्रीच नंदुरबारात दाखल झाले होते. तर काही उमेदवार गुरुवारी सकाळी दाखल झाले होते. मैदानावर आधी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची त्याच ठिकाणी नोंदणी झाली. किमान दहावी उत्तीर्ण आणि 20 ते 50 वर्ष वय असणे आवश्यक होते. या पात्रतेत बसणा:या उमेदवारांची नोंदणी करण्यात येवून दुपारनंतर काही उमेदवारांची शाररिक चाचणी देखील सुरू करण्यात आली होती.शाररिक चाचणीत पुरुषांसाठी 1600 मिटर धावणे तर महिलांसाठी 800 मिटर धावणे, छाती, उंची आदी शाररिक चाचणी करण्यात आली. मैदानापासून ते मुख्य रस्त्याने जिल्हा परिषद गेटर्पयत धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, सिताराम गायकवाड, प्रभारी राखीव पोलीस निरिक्षक डी.एस.गवळी, पोलीस निरिक्षक संजय मथुरे, संजय महाजन, निवृत्ती पवार यांच्यासह 20 अधिकारी व 120 कर्मचारी तैणात करण्यात आले होते.दरम्यान, शुक्रवारी सायंकाळर्पयत भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देखील अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.वाढती बेरोजगारी आणि पोलीस भरतीत पाच टक्के आरक्षण राहत असल्यामुळे अनेक युवकांचा कल आता होमगार्ड भरतीकडे राहत असल्याचे दिसून येते. होमगार्ड जवानाला एका डयुटीचे 400 रुपये मानधन मिळते. सण, उत्सव, परीक्षा या काळात तसेच कायदा व सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्यास होमगार्डची नियुक्ती केली जाते. होमगार्ड भरतीसाठी जिल्ह्यातील रहिवासी असणे ही महत्त्वाची अट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोप:यातील युवक तसेच बेरोजगार महिला, पुरुष या भरतीसाठी उपस्थित होते.भरतीसाठी किमान दहावी उत्तीर्ण ही अट असली पदवीधर, उच्च पदवीधर युवक देखील मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बेरोजगार म्हणून घरात बसण्यापेक्षा होमगार्ड बनलेले काय वाईट अशा प्रतिक्रया काही युवकानी यावेळी व्यक्त केल्या.
होमगार्डच्या 301 जागांसाठी दीड हजार उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:35 PM