लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : राष्टÑ उभारणीतील प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मोलाचे योगदान देणारा सर्जाराजाची नितांत आवश्यकता भासते. शेतकऱ्यांना सोयीनुसार सर्जाराजा उपलब्ध व्हावा, यासाठी तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत पशू मेळावा घेण्यात आला. यात ८६५ बैलांची विक्री झाली असून एक कोटींची उलाढाल झाली आहे.तीन राज्यातील पशुधन तथा बैल खरीदी-विक्रीच्या सर्वात जुन्या बाजारपेठेपैकी तळोद्याची बाजारपेठ एक आहे. तळोद्याच्या बैलबाजारासह मध्यप्रदेशातील खेतिया व गुजरातमधील कंवाट या तीन बाजारपेठेत सर्वाधिक बैलांची खरे-विक्री करण्यात येते. या तिन्ही बाजारपेठेत तिन्ही राज्यातील शेतकºयांची उपस्थिती असते. याशिवाय अक्षय तृतीयाच्या कालावधीत भरणाºया बैल बाजारात देखील मोठी उलाढाल होत असते. तळोदा येथील आठवडे बाजाराच्या दिवशी भरणाºया बैल बाजारासह अन्य दिवशीही येतील बैल खरेदी-विक्रीला चांगला प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तळोद्यात पशू मेळावा भरविण्यात येत आहे.या मेळाव्याला देखील शेतकºयांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्यामुळे मेळावा भरविण्यात तळोदा कृउबाने सातत्य ठेवले आहे. यंदा १ ते ५ जानेवारी या कालावधीत हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी एक हजार बैल विक्रीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी मेळाव्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ८६५ बैलांची खरेदी-विक्री झाली. यातून एकूण एक कोटींची उलाढाल झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुत्रांमार्फत सांगण्यात आले.मेळाव्यात गुजरातमधील तापी, नर्मदा, मध्यप्रदेशातील धार व झांबूआ जिल्हा तर महाराष्टÑातून धडगाव, शहादा, अक्कलकुवा, तळोदा, साक्री व शिंदखेडा या भागातील शेतकरी तथा पशूपालकांनी बैल विक्रीसाठी आणले होते. तर खरेदीसाठी वर नमुद सर्व ठिकाणांसह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथूनही शेतकरी आले होते. मेळाव्यात शेती साहित्यही विक्रीसाठी दाखल झाले होते.फेब्रवारीनंतर दरवर्षी नंदुरबार जिल्ह्यात होणाºया सर्वच यात्रोत्सवात बैलबाजार भरविला जातो. त्यात अक्कलकुवा, खापर तर कुकरमुंडा (गुजरात) येथील यात्रोत्सवात हा बाजार भरतो. यासाठी तिन्ही राज्यातील शेतकरी उपस्थिती नोंदवत असतात. या तिन्ही प्रमुख यात्रेनंतर वर्षाअखेरीस तथा पावसाळा सुरू होण्यापूर्वी तळोदा येथे अक्षय्य तृतीयेचा यात्रोत्सव साजरा केला जातो. खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी ही यात्रा होत असल्याने हंगामात शेतीकामासाठी लागणाºया सर्जाराजांची आवश्यकता भासत असल्याने शेतकºयांची उपस्थिती मोठी असते. या यात्रेतील बैलबाजाराला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असते. हा प्रतिसाद विचारात घेत बाजार समितीमार्फत हा पशू मेळावा सुरू करण्यात आला आहे.
तळोद्याच्या पशू मेळाव्यात एक कोटीची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:32 PM