पाच हजार रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना नंदुरबार जिल्हा विभागीय समन्वयक प्रा. डॉ माधव कदम, प्रा. डॉ. संदीप मराठे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सोनाली पाटील, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. उल्लास सोनवणे, प्रा. इरफान पठाण उपस्थित होते. महाविद्यालयातील एन.एस.एस. एककाचे कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी सोलर एनर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ट्री प्लांटेशन, प्लास्टिक मुक्त कॅम्पस इ. संदर्भात भरीव कामगिरी केल्याबद्दल सदर पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारासाठी ९ कॉलेजचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातून वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची निवड करण्यात आली.
यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हा. चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए.के. पटेल, संस्थेचे संचालक अभिजित एम.पाटील, महाविद्यालयीन विकास समिती सदस्या प्रीती अभिजित पाटील व संचालक मंडळ यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.