लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील शहाणे शिवारात शेतातील झोपडीवर अचानक वीज कोसळून एक ठार तर अन्य 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली़ जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आल़े या घटने मूळे परिसरात हळहळ व्यक्त होत आह़े शहाणे शिवारात गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात तेरसिंग रुपाला पावरा हे परिवार सह झोपडी करुन राहत होत़े गत 3 ते 4 दिवसांपासून पावसाने आक्रमक स्वरूप धारण केले आह़े सोमवारी दुपारपयर्ंत पावसाचे फराशे वातावरण नव्हत़े परंतु चार वाजेच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही वेळातच विजांच्या कडकडाटासह सह तुफान पावसाला सुरुवात झाली़ साडेचार वाजेच्या सुमारास वीज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसर हादरला होता़ ही वीज तेरसिंग पावरा यांच्या झोपडीवर वीज कोसळल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे धाव घेत मदतकार्यालया सुरुवात केली़ वीजेच्या धक्क्याने तेरसिंग रुपला पावरा (60) गंभीर जखमी झाले होत़े त्यांच्यावर शहाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला़ घटनेत त्यांच्या परिवारातील रीना देवसिंग पावरा (15) समीर दल्या पावरा (7) सेविबाई रामा पावरा (28) समित्रा दल्या पावरा (11) जयवंती दल्या पावरा (28) हे सहा जण जखमी झाले आहेत़ शहादा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.माधुरी पावरा, डॉ. सचिन पावरा यांनी उपचार केल्यानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंदाणे येथील मंडळ अधिकारी प्रदीप पाटील, बी़ ओ़पाटील, व्ही़डी़साळवे, तलाठी व्ही़एस़कोठारी यांनी घटनास्थळी भेट दिली़
मयत तेरसिंग पावरा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन म्हसावद ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल़े जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून जागोजागी भाजल्याने जखमा झाल्याची माहिती देण्यात आली आह़े वीज पडल्याचे दिसून आल्यानंतर शहाणा गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होत़े पावसातच त्यांनी मदतकार्य करत जखमींना 108 रुग्णवाहिकेतून शहाणा व तेथून मंदाणा येथे आणल़े