नंदुरबार : : भर वस्तीत सुरू असलेल्या अवैध दारूची रिफलिंग करणेआणि विक्रीच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. अवैध दारू, दारू बनविण्याचे साधने व इतर साहित्य असा एकुण एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे. शहरातील नळवा रस्त्यावरील अशोक विलास पार्कमधील प्लॉट नंबर 16 मध्ये व हॉटेल साईनी येथे अवैध मद्याची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. प्लॉट नंबर 16 मधील घरात अवैध दारूचा मोठा साठा आढळून आला. त्यात मध्यप्रदेश बनावटीची दारूचा मोठा समावेश आहे. दारूच्या विवधि नामांकीत कंपन्यांची खाली बाटल्या, बुच, लेबल आढळून आले. याशिवाय बनावट दारूचे 11 बॉक्स जप्त करण्यात आले. घरातील मुख्य हॉलसह बेडरुममधील कॉटमध्ये देखील दारूसाठा होता. पथकाने संपुर्ण घराची झडती घेतली. विशाल रमलाल जैसवाल याला अटक करण्यात आली तर कमलेश रमलाल जैयस्वाल हा फरार झाला. पथकाने एकुण एक लाख एक हजार 375 रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरिक्षक मनोज संबोधी, प्रकाश गौड, अनुपकुमार देशमाने, अतुल शिंदे, बी.डी.बागले, अजय रायते, हेमंत पाटील, हितेश जेठे, देवेत्री वसावे यांनी केली.
नंदुरबारात भर वस्तीतून एक लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:59 PM