लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील बोरी आमखेडीपाडा येथील 50 वर्षीय शेतक:याला अतिक्रमित शेतीच्या वादातून बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला़ अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल आह़े बोरी आमखेडीपाडा येथील नकटू केस:या पाडवी हे वनविभागाच्या जमिनीवर शेती करतात़ 31 ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होत़े तेथून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परत येत असताना गावाजवळील नाल्याजवळ शिलदार शंकर पावरा, रायकीबाई शिलदार पावरा,विरसिंग शिलदार व गिता शिलदार पावरा सर्व रा़ बोरी आमखेडीपाडा यांनी थांबवून वाद घातला़ या वादातून शिलदार पावरा व त्यांचा मुलगा विरसिंग पावरा या दोघांनी नकटू पावरा यांना बेदम मारहाण केली़ यात विरसिंग याने हातातील डेंग:याने मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाली़ घटनेनंतर नकटू पावरा यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरू असताना तीन रोजी रात्री एक वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर 4 रोजी नकटू पावरा यांचा अंत्यविधी करण्यात आला़ याबाबत दिपक पाडवी याने धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शिलदार, रायकीबाई, विरसिंग आणि गिता या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़ पाटील, पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी बोरी आमखेडीपाडा येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एऩपी़चव्हाण करत आहेत़
अतिक्रमित जमीनीच्या वादातून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:41 AM
धडगाव तालुक्यात घटना : अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा दाखल
ठळक मुद्दे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अंत्यसंस्कार नकटू पावरा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचे नातलग व ग्रामस्थ यांनी धडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होत़े याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल़े मात्र त्यांच