शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

एका संशयिताचा गुजरातमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील भिमनगरमधील ७५ वर्षीय वृद्धेला कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील भिमनगरमधील ७५ वर्षीय वृद्धेला कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरु आहेत तर अहमदाबाद येथे कामावर असलेला पिंप्रीपाडा येथील ४५ वर्षीय पुरुष कोरोनासदृश्य लक्षणांमुळे उपचारादरम्यान मृत झाल्याने शुक्रवारी मध्यरात्री अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दफनविधी पार पडला. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, शहरातील एका कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.शहरातील भिमनगरमधील वृद्धेला १० जुलै रोजी ताप आल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीअंती मलेरियाचे निदान झाले. तेथे व शहरातील खाजगी दवाखान्यात तीन दिवस त्यांनी औषधोपचार घेतले. १४ जुलै रोजी पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. गुजरातमधील सुरत येथे त्यांना दोन दिवसापूर्वी नेण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तेथील प्रशासनाने ही बाब जिल्हा प्रशासनास कळविल्याने स्थानिक प्रशासनाकडून भिमनगरचा परिसर सील करुन कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आला. वृद्धेच्या परिवारातील एकास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले तर पाच जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. शहरातील तिघांवर आधीच सुरत येथे तर २८ वर्षीय महिलेवर व्यारा येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, महादेव गल्लीतील तिघांपैकी दोघांचा स्वॅब अहवाल निगेटीव्ह आल्याने शहरास दिलासा मिळाला आहे.गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्रीपाडा ता.नवापूर येथील ४५ वर्षीय पुरुष अहमदाबाद येथे खाजगी कंपनीत कामाला होता. जवळच असलेल्या बंधारे गावातील सहा जणही त्याच्यासोबत कामावर होते. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यास एक आठवड्यापूर्वी सेंट्रल हॉस्पिटल पालनपूर, जि.बनसकांठा येथे दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचा चाचणी अहवाल प्रलंबित असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तेथून पिंप्रीपाडा येथे पाठवण्यात आले. त्याच्यासोबत काम करणारे बंधारे येथील सहा जणांनी त्याचा मृतदेह आणला. शुक्रवारी रात्री नऊ वाजता मृतदेह पिंप्रीपाडा येथे पोहचल्यावर मयताच्या शेतात रात्री ११ वाजेपर्यंत शासकीय नियमानुसार गावकऱ्यांच्या अनुपस्थितीत मृतदेह दफन करण्यात आला. त्या सहा जणांनीच हा दफनविधी पूर्ण केला. त्या सहाही जणांना नवापूरच्या विलगीकरण कक्षात मध्यरात्री १२ वाजता दाखल करण्यात आले. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक पोलीस निरीक्षक धीरज महाजन, निवासी नायब तहसीलदार कोकणी, विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.दरम्यान, नवापूर शहरातील राजीवनगरमधील रहिवासी असलेल्या ७२ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णावर सुरत येथे सुरु असलेल्या उपचारादरम्यान कोरोना अहवाल शनिवारी निगेटीव्ह आला. ते संसर्गमुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.