रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा तसेच लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े त्यामुळे येथील इतर रब्बी पिकांसह कांदा पिक धोक्यात आलेले दिसून येत आह़ेपरिसरात ठिबक सिंचनावर कांदा पिकाची लागवड करण्यात येत आह़े यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच दिवसेंदिवस जिल्ह्यात पाण्याची पातळी खोल जात आह़े त्यामुळे साहजिकच पिकांसाठी पाण्याची व्यवस्था करणे शेतक:यांना जड जात असल्याचे दिसून येत आह़े पाण्याअभावी पिक जगविणे शेतक:यांना अवघड जात आह़े तळोद्यात शेतक:यांकडून शेताचा उतार बघून लागवडीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळण्यात येत आह़े त्यानंतर वाफ्यांना जेमतेम पाणी देण्यात येत आह़े त्यानंतर एका वाफ्यावर दोन समांतर ठिबक पसरवून त्याव्दारे कांदा पिकाला पाणी देण्यात येत आह़े विहिरी गेल्या खोलतालुक्यातील खेडोपाडी असलेल्या विहिरींची पाणी पातळी खालावली आह़े अनेक विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत़ त्यामुळे सर्वच जलस्त्रोत आटले असल्याने कांदासह इतर रब्बी पिकांना पाणी देताना शेतक:यांना जड जात आह़े विहिरी खोल गेल्या असल्याने अनेक शेतक:यांकडून विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े परंतु तरीदेखील पाणी लागत नसल्याने विहिर खोलीकरणाचाही पैसा वाया जात असल्याचे परिसरातील शेतक:यांकडूनसांगण्यात येत आह़े गेल्या खरिप हंगामातदेखील पाण्याअभावी कांदा पिक धोक्यात आले होत़े मात्र त्यानंतर जेमतेम उत्पादित कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने शेतक:यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले होत़े आता पुन्हा रब्बी हंगामातदेखील पाण्याच्या टंचाईमुळे कांदा पिकाला धोका निर्माण झाला आह़े तरीदेखील काही शेतक:यांकडून यावर मात करुन ठिबक सिंचनाव्दारे कांदा पिकला पाणी देण्यात येत आह़े
पाण्याअभावी कांदा पिक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:05 PM