नंदुरबार : येथील बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कांद्याची ढेसर झाली असून भाव घसरला. अवघा साडेपाचशे रुपये क्विंटल दराने शेतक:यांना कांदा विकावा लागला. आणखी काही दिवस ही स्थिती राहणार असल्याचे चित्र आहे.येथील बाजार समितीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली आहे. येथील बाजारात नंदुरबार तालुक्यासह साक्री व दोंडाईचा भागातून कांद्याची आवक होते. बुधवारी पाचशे कट्टे कांद्याची आवक झाली. आवक वाढल्याने भाव घसरला. चांगल्या प्रतिचा कांदा साडेपाचशे रुपये क्विंटलर्पयत विकला गेला. कमी प्रतिचा कांदा पावणे पाचशे ते पाचशे रुपये क्विंटल होता. येत्या काही दिवसात ही स्थिती राहणार आहे. सध्या वातावरणात बदल सुरू आहे. कधी तीव्र थंडी तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती राहत आहे. असे वातावरण कांद्याला मारक असते. त्यामुळे शेतकरी कांदा विक्री करण्यासाठी घाई करीत असल्याचे चित्र असून त्यामुळेच आवक वाढली आहे. ढगाळ वातावरणाचे प्रमाण कमी झाल्यानंतर भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
कांदा घसरला अवघा साडेपाचशे रुपये क्विंटल
By admin | Published: January 18, 2017 11:33 PM