ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कजर्मुक्तीसाठी जिल्ह्यातील 29 हजार शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज भरून दिले आहेत़ विशेष म्हणजे राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा 15 दिवस आधीच 32 हजार शेतक:यांची नोंदणी झाल्याने जिल्ह्याने योजनेत आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आह़े गेल्या वर्षात जिल्ह्यातील विविध 58 राष्ट्रीयकृत बँकांकडून 22 हजार 500 तर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून 19 हजार शेतक:यांना खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले होत़े यात मार्च 2017 अखेर जिल्हा बँकेत साडेतीन हजार शेतक:यांनी कर्ज परतावा केल्यानंतर 15 हजार शेतक:यांकडे पीककर्ज थकीत होत़े राष्ट्रीकृत बँकांकडे केवळ पाच हजार शेतक:यांनी कर्ज परतावा केला होता़ यातच सन्मान योजना सुरू केल्यानंतर कर्ज परतावा करणारे आणि थकबाकीदार शेतकरी कर्ज मुक्तीसाठी पात्र ठरले होत़े याअंतर्गत शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश दिल्यानंतर आजअखेरीस ऑनलाईन अर्ज भरणा केंद्रांवर 32 हजार 566 शेतक:यांच्या नोंदण्या पूर्ण पूर्ण होऊन 29 हजार 610 शेतक:यांनी अर्ज भरून दिले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांचे एकूण 42 हजार कजर्दार शेतकरी आहेत़ शेतक:यांनी दाखल केलेल्या अर्जाची 15 सप्टेंबरनंतर राष्ट्रीयकृत बँका तपासणी करून तसा अहवाल सहकार विभागाला सादर करतील यानंतर दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतक:यांना तात्काळ कजर्मुक्त करण्यात येईल तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतक:यांकडून दीड लाखावरील कर्जाचा भरणा केल्यानंतर कर्ज माफ केले जाणार आह़े जिल्हा बँकेच्या सर्व 31 शाखा आणि 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या 58 शाखांचे कजर्दार शेतकरी शासनाचे महा-ई-सेवा, संग्राम आणि सीएसई केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरणा करून कजर्मुक्तीचा सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत़
29 हजार शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज ‘सबमिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:52 AM