लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी शेतक:यांचे भरड धान्य खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात 19 खरेदी केंद्रे सुरु केली आहेत़ 23 दिवस उलटूनही या केंद्रांवरची आवक तुरळक असून अद्याप केवळ 1 हजार क्विंटल धान्य आवक झाली आह़े यातून केंद्रांबाबत शेतक:यांमधील उदासिनता स्पष्ट होत आह़े1 नोव्हेंबरपासून आदिवासी विकास महामंडळांने भरड धान्य केंद्रांना सुरुवात केली होती़ यात आजअखेरीस 1 हजार 159 क्विंटल धान्याची आवक झाली आह़े यात 1 हजार 90 क्विंटल ज्वारी तर 129 क्विंटल 68 किलो मकाचा समावेश आह़े 31 डिसेंबर्पयत ही केंद्रे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनात घट आल्याने शेतक:यांनी धान्य साठा करण्यावर भर दिला होता़ यातून दिवाळीपूर्वी सर्व खरेदी केंद्रे ओस पडल्याचे दिसून आल़े दिवाळीनंतर केंद्रांमध्ये व्यवहारांना वेग येण्याची अपेक्षा महामंडळाकडून वर्तवण्यात आली होती़ याला अल्पप्रतिसाद मिळाल्याचे समोर आलेल्या धान्य आवकच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े दिवाळीपूर्वी आणि नंतर काही शेतक:यांनी आणलेले धान्य हे एफक्यू दर्जाचे नसल्याचे सांगत काही ठिकाणाहून शेतक:यांना परत पाठवण्यात आले होत़े याचाही परिणाम आवकवर झाल्याचे सांगण्यात आले आह़े विशेष म्हणजे केंद्रात करावयाची ऑनलाईन नोंदणी आणि इतर बाबींच्या पूर्ततेमुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी धान्य देण्याबाबत असमर्थता दर्शवत आहेत़ यातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून महामंडळाच्या खरेदी केंद्रांची स्थिती बिकट होत आह़े नंदुरबार तालुक्यात वावद, टोकरतलाव, लोणखेडा, नटावद, धानोरा, नवापूर तालुक्यात नवापूर, कोठडा, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, तळोदा तालुक्यात प्रतापपूर, शिव्रे, अक्कलकुवा, खापर, मोलगी, धडगाव तालुक्यात धडगाव, चुलवड, मांडवी, शहादा तालुक्यात मंदाणा आणि कजर्त अशा 19 खरेदी केंद्रांची निर्मिती केली आह़े या केंद्रांमध्ये ज्वारी 2 हजार 430, बाजरी 1 हजार 950 तर मका 1 हजार 700 रूपयांना खरेदी करण्यात येत आह़े या केंद्रांमध्येच धानची खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू तूर्तास एकाही शेतक:याने धान विक्रीसाठी आणलेला नसल्याची माहिती देण्यात आली आह़े
एकाधिकार खरेदी केंद्रात अवघे हजार क्विंटल धान्य आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:43 PM