शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

नंदुरबार जिल्हा परिषदेत महाआघाडीला संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 4:18 AM

जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही.

नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. भाजप २३, काँग्रेस २३, शिवसेना ७ तर राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. मात्र, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.सहापैकी तीन पंचायत समितींवर भाजप, दोन पंचायत समितींवर काँग्रेस तर एका पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी चारही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे तिरंगी व चौरंगी लढती रंगल्या होत्या. निकालाचा कौल पहाता कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. भाजप व काँग्रेसने सारख्याच अर्थात प्रत्येकी २३ जागा जिंकल्या. बहुमतासाठी किमान २९ सदस्य लागणार असल्याने सात जागांवर विजयी झालेल्या शिवसेनेला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्टÑवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपने नंदुरबार व शहादा तालुक्यात वर्चस्व राखले. काँग्रेसने नवापूर धडगाव व शहादा तालुक्यात वर्चस्व राखले. शिवसेनेने धडगाव व नंदुरबार तालुक्यात जागा मिळविल्या. राष्टÑवादीला केवळ नवापूर तालुक्यातच जागा मिळू शकल्या.>पाडवी यांची पत्नी पराभूतनिवडणुकीत माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पूत्र, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र व सून, माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी, माजी आमदार शरद गावीत यांच्या दोन्ही कन्या, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची कन्या व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र आदी निवडून आले तर आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना मात्र, पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद