n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे मयत बालिकेच्या कुटूंबाला एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी, घरपट्टी सवलतीचा ठराव करावा यासह इतर मागण्यांसाठी भाजपच्या सदस्यांनी बैठकी ऑनलाईन सर्वसाधारण बैठकीच्या वेळी मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर बसून निषेध केला. तसेच त्यांना निवेदन देखील दिले.नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता ॲानलाईन झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा भारती राजपूत होत्या. बैठकीच्या अजेंड्यावर दहा विषय होते. ते एकमताने मंजुर करण्यात आले.दरम्यान, विरोधी नगरसेवकांनी बैठकीच्या कालावधीत मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर बसून विविध मागण्या केल्या. विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. त्यानंतर मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, हिताक्षी महाजन या सहा वर्षीय बालिकेचा कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज होऊन मृत्यू झाला. पालिकेच्या सर्व सदस्यांनी एकमताने ठराव करून २०२०-२१ मधील बजेटमध्ये दहा लाख रुपयांचा निधी कुत्र्यांच्या निर्बीजीकरण, रेबीज इंजेक्शन तसेच जंतनाशक औषधांसाठी मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी केली नसल्यानेच बालिकेचा मृत्यू झाला. पालिकेतर्फे महाजन कुटूंबियांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई त्वरीत देण्यात यावी. तातडीने कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबतच्या ठरावाची अंमलबजावणी करावी. मोकाट जनावारांचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यांच्या हल्ल्यात कुणी जखमी झाल्यास वा मृत झाल्यास त्यास पालिकेने नुकसानभरपाई द्यावी. कोरोना काळात शहरातील नागरिकांना मालमत्ता करात अद्यापही मालमत्ता करात अद्यापही सुट दिलेली नाही, ती ठरावाप्रमाणे मिळावी. पालिका नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांची व त्यांच्या कुटूंबियांची मालमत्ता कराची माहिती जाहीर करावी असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
नंदुरबार पालिकेत विरोधकांचा सीओंच्या केबीन बाहेर निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:34 PM