लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘अमरीशभाई, अच्छे दिन हमारे भी आयेंगे..’ असे सांगत गेल्या तीन वर्षापासून मंत्रीपदापासून दूर राहिलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांनी यांनी खंत व्यक्त केली. निमित्त होते सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाचे.सातपुडा साखर कारखान्याचा 44 वा गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक आदी उपस्थित होते. मंत्रीपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार खडसे यावेळी लपवू शकले नाही. ते म्हणाले, 40 वर्ष समाज व राजकारणात आहे. एकही निवडणूक हरलो नाही, एकही गुन्हा नाही, भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालेला नाही. असे असतांना आपले काय चुकले? असा प्रश्न करीत भाजप सत्तेवर यावी म्हणून रक्ताचे पाणी केले, पण सत्ता मिळताच मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले. डोक्यावरील चंदू टोपी फिरवत त्यांनी सांगितले, डोक्यावरील टोपी फिरवतो, परंतु राजकारणातील टोपी आपण फिरवणार नाही. अमरिशभाई यांच्याकडे पहात त्यांनी अच्छे दिन हमारे भी आयेंगे सांगत भावना मोकळ्या केल्या.आमदार अमरिशभाई पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले.
हमारे भी अच्छे दिन आयेंगे- एकनाथ खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 1:45 PM