नंदुरबार : थकबाकी भरा अन्यथा भर चौकात फलक लाऊन नावे जाहीर करण्याचे नियोजन नंदुरबार पालिका प्रशासनाने केले आहे. पालिकेचे अनेक मोठे थकबाकीदार असून, ते नोटिसा व कायदेशीर प्रक्रियांनादेखील मानत नसल्याने आता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली. दरम्यान, नोटाबंदीच्या वेळी पालिकेची एकूण 30 टक्के वसुली झाली असून उर्वरित वसुलीसाठी करदात्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.नंदुरबार पालिकेतर्फे दरवर्षी विविध करांच्या वसुलीसाठी ठोस उपाययोजना केल्या जातात. परंतु करांची थकबाकी वाढतच जाते. सध्या नागरिकांकडे जवळपास 11 कोटींच्या आसपास थकबाकी आहे. ती मार्च अखेर वसूल करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम आखली आहे. वर्षानुवर्षापासून करांची रक्कम थकविणा:या नागरिकांना आता थेट चौकातच खेचण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मोठय़ा चौकांमध्ये डिजीटल फलक लाऊन त्यात त्या-त्या भागातील थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात येणार आहे.चौकाचौकात फलकमोठय़ा व वर्षानुवर्षे थकबाकीदार असलेल्या करदात्यांना यंदाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. निर्धारित वेळेत त्यांनी कर भरणा केला नाही तर त्यांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतरही त्यांनी कर भरण्यासंदर्भात कानाडोळा केला तर त्यांची नावे थेट फलकांवर लिहून ते फलक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत. त्यासाठी फलकांचा आकार, नावांच्या साईज व ते कुठे लावावे याचे नियोजन पालिकेत सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुख्य चौकांसह ज्या भागातील थकबाकीदार असतील त्या भागातदेखील असे फलक लावण्यात येणार आहेत.14 हजारांपेक्षा अधिक करदातेनंदुरबार पालिकेंतर्गत 14 हजारांपेक्षा अधिक करदाते आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी याद्वारे पालिका नागरिकांकडून कर वसूल करीत असते. दरवर्षी डिसेंबर महिनाअखेर नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटिसा दिल्या जात असतात. निर्धारित वेळेच्या आधी कर भरणा केल्यास किमान एक ते दोन टक्के सूटदेखील दिली जात असते. परंतु नागरिक ऐन मार्च महिन्यातच कर भरणा करण्यासाठी गर्दी करीत असतात. काहीजण तर वर्षानुवर्षे करच भरत नसल्याची स्थिती आहे. सध्यादेखील नागरिकांना कर वसुलीच्या नोटिसा घरपोच देण्यात आलेल्या आहेत.पालिकेतर्फे नियोजनकर वसुलीसाठी पालिकेतर्फे धडक मोहीम आखण्यात येत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली. शहरात एकूण 13 झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनला एक अधिकारी व काही कर्मचा:यांची नेमणूक करण्यात येत आहे. संबंधित झोनची वसुलीची जबाबदारी त्या-त्या झोनप्रमुख आणि पथकाची राहणार आहे. पथक थकबाकीदारांकडे जाऊन भरणा करण्यासंदर्भात आवाहन करणार आहे. ज्या भागाची वसुली कमी झाली त्या झोनच्या प्रमुखांना आणि पथकालादेखील जबाबदार धरण्यात येणार आहे. नोटबंदीचा फायदा कमीचनोट बंदीच्या वेळी कर भरणासाठी पालिकेने जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या. त्यामुळे पालिकेची मोठय़ा प्रमाणावर वसुली होईल, अशी अपेक्षा होती. परंतु केवळ 30 टक्केच वसुली झाल्याचे सिद्ध झाले आहे. नोट बंदीच्या दीड महिन्याच्या काळात पालिकेत एकूण तीन कोटी 14 लाखांचा कर भरणा झाला होता. त्याची टक्केवारी अर्थात 30 टक्केच होती. किमान 50 ते 60 टक्के वसुलीची अपेक्षा पालिकेची होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. तेवढी वसुली झाली असती तर निम्मे वसुलीसाठी मार्चअखेर पालिकेला फारसे कष्ट झाले नसते.राज्य शासनाने 100 टक्के कर वसुली सक्तीची केली आहे. त्याशिवाय पुढील आर्थिक वर्षात मिळणारे विविध अनुदान आणि आर्थिक मदत मिळणार नसल्याचे 17 जानेवारी रोजी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. शहरात विकास कामे आणि पायाभूत सुविधा यांचा विकास करावयाचा असल्यास शासनातर्फे मिळणा:या अनुदान आणि आर्थिक मदतीवरच अनेक पालिकांची दारोमदार असते. ही बाब लक्षात घेता 100 टक्के वसुली करणे प्रत्येक पालिकेला क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळेच मोठय़ा थकबाकीदारांकडे वसुलीसाठी आता पालिकांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यापूर्वी धुळे महापालिकेत मोठय़ा कर थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल-ताशे वाजविण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता नंदुरबार पालिका मोठय़ा फलकांवर अशा लोकांची नावे जाहीर करणार आहे.
थकबाकीदार झळकतील फलकांवर
By admin | Published: February 14, 2017 12:26 AM