शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:24 PM

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील बहुसंख्य खाजगी बोअर आटत आहेत. तथापि, येथील एका घरमालकाने पावसाचे वाया जाणारे पाणी रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे आपल्याच घरापुढील कूपनलिकेस जिरवत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे घराच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीचा किंचीतही प्रभाव या भागात झालेला नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी इतरांनीही असा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.तळोदा शहरातील लवकुमार पिंपरे यांनी आपल्या घरापुढे बोअर केला आहे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने घटत जाणा:या पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निश्चितच निर्माण होणार असल्याची परिस्थिती जाणून पावसाचे  वाया जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. गेल्यावर्षी             पिंपरे यांनी रेनवॉटर हाव्रेस्टींगचा उपक्रम हाती घेतला. आपल्या घराच्या छतावरील वाया            जाणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे बोअरमध्ये सोडले आहे. त्याठिकाणी ठिबकचा फिल्टरदेखील बसवला आहे. त्यामुळे आपोआपच रेती, माती, गाळ व क्षार फिल्टर होऊन त्यांना शुद्ध पाणी           मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अतिशय गोड लागत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रमामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आजूबाजूच्या बोअरचे पाणी कमी झालेले नाही. वास्तविक यंदा अल्प पजर्न्यमानामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय रोजच्या वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीही कमालीची घटत आहे. परिणामी शहरातील बहुसंख्य खाजगी बोअरचे पाणी आटत चालले आहे. मात्र या परिसरात पाण्याच्या पातळीत किंचीतही फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.20 हजाराचा खर्चरेनवॉटर हाव्रेस्टींगसाठी लवकुमार पिंपरे यांना 20 हजार रुपये खर्च आला आहे. घराच्या तीन हजार स्क्वेअर फूट स्लॅबवरील वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्याच बोअरमध्ये जिरविण्यासाठी 25 ते 30 फूट लांबीचे दोन पाईप जोडले आहेत. त्याचबरोबर कूपनलिकेजवळ ठिबक सिंचनचे दोन फिल्टर संच बसविले  आहेत. त्यामुळे त्यांना क्षारविरहीत निसर्गाचे  गोड पाणी मिळत आहे. सध्या निसर्गाचे कालचक्र बदलत चालले आहे. तळोदेकरांनी  कधी नव्हे एवढी दुष्काळी स्थिती पहिल्यांदाच पाहिली आहे. साहजिकच अशा दुष्काळी स्थितीमुळे रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रम आवश्यक बनणार आहे.