लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून वाळू वाहतुकीला बंदी असतानाही नंदुरबार हद्दीतून राज्यातील इतर जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाºया गाडी मालकांना दणका बसला आहे. नंदुरबार महसूल विभागातील पथकाने तब्बल ६३ वाहन मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करीत ९५ लाखांचा दंड ठोठावला आहे.नंदुरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून अवैध वाळू वाहतूक करताना आढळलेल्या ५० वाहनांना पकडून कारवाई करण्यात आली. या वाहनांची संख्या ६५ हून अधिक झाली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाºया या गाड्यांवर दंडात्मक कारवाई तसेच काही गाडी मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. पकडलेल्या वाहनांमध्ये जालना, औरंगाबाद, नाशिक, सांगली येथील वाहनांचा अधिक समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापी पात्रातून तसेच नजीकच्या गुजरात हद्दीतील पात्रातून अनेक वर्षापासून वाळूची तस्करी होत आहे. अवैध वाळू वाहतुकीच्या मालट्रक्स नंदुरबार शहरातून दिवस-रात्र मोठ्या संख्येने धावत असतात. वेगाने धावणाºया या वाहनांमुळे अनेक अपघात होऊन काही जणांनी प्राण गमावले आहेत. लॉकडाऊन कालावधीतही त्यात बदल घडला नाही. म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करणाºया वाहनांना जाण्यास बंदी घालणारा आदेश २९ जून २०२० रोजी जारी केला होता. सात दिवसाचे सात पथके नेमून नियमित निगराणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यातीलच नंदुरबार तहसील कार्यालयाच्या पथकाने नंदुरबार आणि तालुका हद्दीत वाहने पकडून ही मोठी कारवाई केली आहे.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना ९५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:21 PM