लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/कोठार : ऑक्सिजन निर्मिती केंद्र कोविड रुग्णालय शेजारी सुरू करून ऑक्सिजन बेड अद्ययावत करण्यात यावे यासह इतर ही सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे भेट दिली असता दिल्या. पालकमंत्र्यांच्या बैठकीत तळोदा शहरात ऑक्सिजन केंद्र सुरू करणेबाबत चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. याठिकाणी धडगाव, अक्कलकुवा याठिकानचे रुग्ण येत असल्याने याठिकाणी ३० ऑक्सिजन खाटाचे कोविड रुग्णालयात तात्काळ सुरू करावे अश्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनास दिल्या. तळोदा येथील कोविडच्या रुग्णांसाठी तळोदा मुख्यालय करून कोविड रुग्णालय अद्ययावत करणे ऑक्सीजन निर्मिती केंद्र कोविड रुग्णालय शेजारी सुरू करून ऑक्सिजन बेड अद्यावत करण्यात यावे अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यासोबतच उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्यूलर ऑपरेशन गृहास भेट देवून त्यांनी पाहणी केली आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, नगरपालिका पोलीस इतर सर्व संबंधितांनी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत समन्वय साधावा नवीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत त्यांनी सूचना दिल्या. यासोबतच कोविड लसीकरणबाबत जनमाणसात व शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहचविण्यासाठी जनजागृती करण्याबाबत सांगितले. येत्या 8 जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालयात कोबड लसीकरणासाठी ड्राय रन होणार असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी हॉस्पिटल येथे नियुक्ती करण्याबाबत सूचना देऊन प्रशासनास सज्ज राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ.रघुनाथ भोये, तहसीलदार गिरीश वखारे, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलिस निरीक्षक नंदराज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, डॉ. विजय पाटील, डॉ. अभिजित गोलहार डॉ विशाल चौधरी, सार्वजनिक बांधकाम अभियंता उपस्थित होते.
तळोद्यात सुरू होणार ॲाक्सीजन साठवणूक केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 12:43 PM