लोणखेडा (ता. शहादा) येथील चार रस्ता येथे होणाऱ्या ‘प्रेरक शक्तीची मूर्ती’ या पूर्णाकृती पुतळ्याचा पूजन सोहळा विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राहणार असून यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, खासदार सुरेंद्रसिंह नागर, राज्याचे माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री माजी आमदार अमरिशभाई पटेल, माजी पर्यटन विकासमंत्री आमदार जयकुमार रावल, खासदार रक्षा खडसे खासदार हिना गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार संगीताबेन पाटील, आमदार सुधीर तांबे, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आदींची उपस्थिती राहील. सकाळी साडेअकरा वाजता पाटीदार मंगल कार्यालयात आदरांजली सभा होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी केले आहे. दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील स्मारकस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.
पी. के. अण्णा पाटील यांच्या पुतळ्याचे आज पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:33 AM