लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखाना पुरस्कृत तापी नदीवरील नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील 22 बंद उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामाचा आढावा घेण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एच.डी. कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी संबंधित अधिका:यांना कुलकर्णी यांनी उपसा योजनांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना वजा आदेश दिले.तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए.डी. कुलकर्णी यांनी श्री दत्त सारंगखेडा व श्री रामकृष्ण कहाटूळ या पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कार्यस्थळी कामकाजाची पाहणी व माहिती घेतली. या वेळी नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे धुळे येथील अधीक्षक अभियंता एम.एच. आमले, नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी. जोशी, उपअभियंता एस.जी. पाटील, शाखा अभियंता के.एम. चौधरी, सातपुडा कारखान्याचे प्रतिनिधी व उपसा सिंचन विभागाचे अभियंता विनोद पाटील आदी उपस्थित होते. या वेळी मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी विनोद पाटील यांच्याकडून 22 सिंचन योजनांची सुरुवातीपासून ते सद्यस्थितीर्पयतची माहिती जाणून घेतली.22 उपसा सिंचन योजनांची स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत विभागातील दुरुस्ती कामाची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून स्थापत्य विभागाअंतर्गत काही योजनांच्या कार्यस्थळी प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले आहे. परंतु यांत्रिकी व विद्युत विभागाअंतर्गत दुरुस्तीचे कामकाजसंबंधी आतार्पयत काहीही हालचाल होताना दिसत नाही. तिन्ही विभागातील कामे एकमेकांना पूरक असल्याने योजनांच्या दुरुस्तीचे कामकाज वेळेवर होण्यासाठी तिन्ही विभागातील कामकाजाचा समन्वय असणे आवश्यक आहे. शिवाय 22 योजनांची काही कामे कारखाना व्यवस्थापनाशी निगडीत असल्याने योजनांची दुरुस्ती कामे तातडीने होण्यासाठी कारखाना प्रशासन सिंचन विभागास मदत करीत आहे. या वेळी सर्व सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामाचा आढावा घेतल्यानंतर मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना वजा आदेश संबंधित अधिका:यांना दिल्या.
उपसा योजना दुरूस्ती व सुरू करण्यासाठी हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:23 PM