शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी आणि गृहपाल व भोजन ठेकेदाराची माणसे यांना बदलावे म्हणून 70 ते 80 विद्याथ्र्यानी पाच किलोमीटरची पायपीट करीत तहसीलदारांची भेट घेऊन व्यथा मांडली.तालुक्यातील मामाचे मोहिदे येथे आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात सुमारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी राहतात. शहरातील विविध महाविद्यालयातून हे विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृहाचे गृहपाल संजय काकडे हे विद्याथ्र्याना योग्य वागणूक देत नाहीत. विद्याथ्र्याचे शैक्षणिक साहित्य, टेबल-खुर्ची, दूरदर्शन संचाची दुरवस्था झाली असून वसतिगृहाच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिले जात नाही. याबाबत काकडे हे वरिष्ठांना कळवीत नसल्याची त्यांची बदली करण्याची मागणी या विद्याथ्र्यानी तहसीलदार नितीन गवळी यांच्याकडे केली.तहसीलदार गवळी यांनी विद्यार्थी व गृहपाल यांच्याशी चर्चा केली. दोघांच्या बाजू समजून घेऊन स्वयंपाक करणारे कर्मचारी बदलावे व सफाई कामगाराबाबत वरिष्ठांकडे मागणी केली. दोघांमध्ये समजोता झाल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा पायपीट करीत वसतिगृहाकडे निघाले. या वेळी तोरणमाळचे सरपंच सीताराम पवार, ईश्वर पाटील, विद्यार्थी जितेंद्र भांगल्या पावरा, सागर वनसिंग पाडवी, रामसिंग दित्या वसावे, रवींद्र गिलदार पावरा, दीपक वसावे, जयसिंग नाईक, अनिल पावरा, गणेश पावरा, मनीष खर्डे, धनसिंग पावरा, अरुण पावरा, अक्षय पावरा, नरेंद्र पावरा, दीपक पावरा, गणेश पावरा, योगेश पावरा, नीलेश पावरा यांच्यासह 70 ते 80 विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)गृहपालच्या बदलीची मागणी वसतिगृहाचे गृहपाल हे समस्यांबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा न करता विद्याथ्र्याना योग्य वागणूक देत नाहीत. तसेच स्वयंपाक करण्यासाठी दिलेली ठेकेदाराची माणसे विद्याथ्र्याशी उद्धटपणे वागतात. जेवणाबाबत या त्यांच्याशी चर्चा केली तर ते विद्याथ्र्याशी हुज्जत घालून तुम्हाला जेवण देणार नाही, असा दम देतात. त्यामुळे या वसतिगृहाचे गृहपाल व भोजन ठेकेदाराने नेमलेली माणसे बदलण्याची मागणीही या विद्याथ्र्यानी तहसीलदार नितीन गवळी यांच्याकडे केली.
पायपीट करीत विद्याथ्र्यानी मांडल्या व्यथा
By admin | Published: February 15, 2017 12:12 AM