शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

नवापुर तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या वेदना मुख्यमंत्र्यांर्पयत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:28 AM

मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार : खासदार राजेंद्र गावीत यांची नवापूर व विसरवाडीला भेट

विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथील पुरग्रस्त भागात पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी भेट दिली. उद्या होणा:या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नुकसानीबाबत चर्चा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देऊ असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.विसरवाडी येथील सरपणी नदीच्या महापुरातील नैसर्गिक आपत्तीमुळे नदी किनारी राहणा:या रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यात तालुक्यातील पाच जणांचा बळी गेला व अनेकांची जनावरे दगावली. तसेच अनेकांची घरे वाहून गेली, शेतीचे मोठे नुकसान झाले. या पुरग्रस्त भागाला पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी भेट दिली असता त्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.लोकमतशी बोलतांना खासदार गावीत यांनी सांगितले की, नवापूर तालुक्यातील जनतेने मागील 50 ते 60 वर्षात हा मोठा प्रलय अनुभवला आहे. यात ग्रामस्थांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांची घरे वाहून गेलेली तर पाळीव जनावरे दगावली आहेत. अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. अश्यावेळी शासनाकडून मिळणारी मदत फार कमी प्रमाणात मिळते ही मदत फार अपुरी पडते याबाबत मी जिल्हाधिका:यांशी चर्चा केली आहे.या दु:खद घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सर्व अहवाल सादर करून पुरग्रस्तांना जास्तीत जास्त निधी कसा प्राप्त करून देता येईल याबाबत मागणी करणार आहे. तसेच आदिवासी विभागाच्या मंत्र्यांशीदेखील आदिवासी खात्याकडून कसा निधी उपलब्ध करता येईल याबाबत चर्चा करणार आहे. हा माझा मतदारसंघ नसला तरी या भागाशी माझी बांधीलकी आहे. मी याच मातीतला आहे आणि हे माङो कर्तव्यदेखील आहे, असे मी समजतो. यावेळी त्यांच्यासोबत नवापूर नायब तहसीलदार बी.एस.पवार, मंडळ अधिकारी बी.एन.सोनवणे,  हळदाणीचे तलाठी आर.एल. पाडवी उपस्थित होते. नवापूर तालुक्यात महापुरामुळे आलेल्या नैसर्गिक आपदेचे चित्र चिंताजनक असून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवापूरसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करु अशी ग्वाही पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी दिली. पूरग्रस्त विसरवाडी व नवापूरची पाहणी करून त्यांनी तहसील कार्यालयात आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार राजेंद्र नजन व दराडे यांनी खासदार राजेंद्र गावीत यांना पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. या बैठकीनंतर लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, नवापूर तालुक्यात नैसर्गिक आपदेचे चित्र चिंताजनक आहे. लोकांसह शेतक:यांना मोठा फटका बसला आहे. त्याची पुनर्बाधणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवापूरसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करु अशी ग्वाही देत ते म्हणाले मी कुठेही असलो तरी माझी बांधीलकी नंदुरबार जिल्ह्याशी राहिली आहे. त्याच भावनेतून नवापुरात येवून पूरग्रस्त लोकांच्या भेटी घेतल्याचे त्यांनी सांगितले.