शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', PM नरेंद्र मोदींची बेंजामिन नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
5
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
6
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
7
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
8
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
9
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
10
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
11
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
12
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
14
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
15
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
16
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
17
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
18
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
19
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
20
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

आरतीसह पालखी सोहळा साध्या पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 1:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा :  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा :  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी सात वाजता आरती व पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी उत्साह राहणार नसल्याने महानुभाव पंथीय अनुयायांसह भाविकांची निराशा झाली आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सारंगखेडा यात्रोत्सव रद्द केला आहे.  मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचे दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन पाटील, सचिव भिक्कन पाटील व उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. मंदिर प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार प्रत्येकी तीन फुटाचे अंतर ठेवत भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था केली आहे. पालखी सोहळ्यासाठी महानुभाव पंथीय अनुयायी मोजक्या संख्यने उपस्थित राहून सर्व सोपस्कार पार पाडतील. सायंकाळी आरती होऊन दत्तांचा पालखी सोहळा मंदिरापासून मुख्य बाजारपेठ, बसथांबामार्गे निघून मंदिरात त्याचा समारोप होईल. दत्तजयंती काळात गर्दी होऊ नये व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सारंगखेडा येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, १०३ पोलीस कर्मचारी, ३३ महिला पोलीस कर्मचारी, सहा होमगार्ड यांचा बंदोबस्त राहणार आहे. सारंगखेडा गावाला यामुळे पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून, भाविक कमी व पोलीस जास्त असे सध्याचे चित्र आहे.

आरोग्य विभागाकडून धुरळणीसारंगखेडा ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून दत्त मंदिरापासून धुरळणी करण्यास प्रारंभ झाला. या वेळी ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील उपस्थित होते. संपूर्ण गावात धुरळणी करण्याचे नियोजन असल्याचे पाटील यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून दोन पथके नेमण्यात आली आहेत. हॉटेल्स, खानावळ, शितपेय विक्री दुकानांवर जाऊन या पथकातील कर्मचारी तपासणी करतील. स्थानिक व्यापारी व भाविकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा यांनी दिली.

प्रशासनाकडून पाहणीसारंगखेडा येथे श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी  मंदिर परिसराची पाहणी करुन पूर्वतयारीची माहिती घेतली. पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभाग व मंदिर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिक्कन पाटील, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, मंडळ अधिकारी जुबेर पठाण आदी उपस्थित होते.