ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.30 - पंढरीसी जारे आल्यानो संसारा।। दिनाचा सोयरा पांडूरंग ।। वाट पाहे उभा भेटीची आवडी ।। कृपाळू तातडी, परमार्थाची ।।
वरील ओळींद्वारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की, संसार दु:खाचा विचार आह़े त्या दु:खातून शांती प्राप्त व्हावी म्हणून संसारिक लोकांनी एकदा तरी परमात्म्याचे दर्शन घेण्यासाठी पंढरीची वारी करावी, त्याठिकाणी गेल्यावर पांडूरंगाच्या पायी डोके ठेवल्यानंतर परमार्थाच्या दिशेचा साक्षात्कार होतो़ संत तुकाराम महाराजांच्या वरील उपदेशाचा भावार्थ कळलेले वारकरी मंगळवारपासून पंढरपूरकडे पायी दिंडीने रवाना होणार आहेत़
नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी तीन मुख्य दिंडय़ांसोबत ग्रामीण भागातून असंख्य भाविक रवाना होणार आहेत़ यात सर्वात जुन्या खंडोजी महाराजांच्या दिंडीला 192 वर्षाचा इतिहास आह़े संस्थानाचे संस्थापक खंडोजी महाराज यांच्या गुरूंनी सुरू केलेला वसा आजही अवितरपणे त्यांचे वंशज पुढे नेत असून, दरवर्षी संख्येत वाढ होत आह़े नंदुरबार तालुक्यातून शनिमांडळ आणि भालेर परिसरातून वारकरी चार जूनपासून रवाना होणार आहेत़ लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघणा:या वारकरींच्या निरोपासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथून पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यासाठी भाविक रवाना होण्यास सुरूवात झाली आह़े नंदुरबार जिल्ह्यातून जाणा:या या सर्वात मोठय़ा दिंडीत शहादा, ब्राrाणपुरी, मोरवड, मोड, बोरद, तळवे, नंदुरबार तालुका व शहर आणि गुजरात राज्याच्या विविध भागातील भाविक सहभागी होतात़
तब्बल 26 दिवस पायी होणा:या दिंडीची तयारी पूर्ण झाली असून दिंडीसोबतच्या पालखीची सजावट करण्यात वारकरी आणि परिसरातील भाविक व्यस्त आहेत़ दिंडी रवाना होण्याच्यानिमित्ताने कुकुरमुंडा येथे विविध कार्यक्रम खंडोजी महाराज संस्थानचे गादीपती उद्धव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेत़ किर्तन आणि भक्तीमय कार्यक्रमांद्वारे 30 रोजी दुपारी चार वाजता ही दिंडी मार्गस्थ होणार आह़े खंडोजी महाराजांच्या मंदिरावरून ही दिंडी मार्गस्थ होणार आह़े साधारण 500 वारक:यांचा या दिंडीला निरोप देण्यासाठी तळोदा तालुक्यासह गुजरात राज्यातील असंख्य भाविक आणि कुकरमुंडा व लगतच्या परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत ही दिंडी मार्गस्थ होणार आह़े